Sun, Jan 29, 2023

घनकचरा प्रक्रिया
प्रदर्शनाचे उद्घाटन
घनकचरा प्रक्रिया प्रदर्शनाचे उद्घाटन
Published on : 20 January 2023, 2:16 am
पिंपरी, ता. २० ः कचऱ्यापासून खत निर्मिती, ई- वेस्ट व कचऱ्याचा पुनर्वापर याविषयी माहिती प्रदर्शन महापालिकेतर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित केले आहे. त्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. रविवारी (ता. २२) समारोप होईल. जेईनम फुड ॲंड वेस्ट प्रोजेक्ट, विनटेक स्क्वेअर, इनरिच टेक, ग्रीनेरीया रिन्युएबल टेक्नॉलॉजीस, कन्सेप्ट बायोटेक, सिरीअस इन्व्हायरोन्स एलएलपी, देव बायोफयुअल आदी सुमारे दोनशेपेक्षा अधिक कंपन्यांचे स्टॉल आहेत. त्यांचे प्रात्यक्षिकही बघायला मिळणार आहे.
--