आम आदमी पार्टीच्या संकल्प सप्ताहची सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम आदमी पार्टीच्या संकल्प सप्ताहची सुरुवात
आम आदमी पार्टीच्या संकल्प सप्ताहची सुरुवात

आम आदमी पार्टीच्या संकल्प सप्ताहची सुरुवात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ : आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने २१ ते २७ जानेवारी दरम्यान संकल्प सप्ताह राबवण्यात येणार असून, त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. २१ जानेवारी रोजी मुकाई चौक, रावेत येथे संतोषी नायर यांच्या किवळे रावेत आपच्या शाखेचे तसेच, काळेवाडी येथील संजय मोरे यांच्या काळेवाडी- नढेनगर शाखेचे उद्घाटन आपच्या शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, शहर प्रचारप्रमुख राज चाकणे, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, शहर संघटन प्रमुख मनोहर पाटील, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष ब्रम्हानंद जाधव, शहर महिला प्रमुख ज्योती शिंदे, सरोज कदम, पूनम गीते, संतोषी नायर, सचिन पवार, सुरेश भिसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. चिंचवड विधानसभेचे कार्याध्यक्ष यशवंत कांबळे यांनी आयोजन केले.