
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत आठशे खेळाडू सहभागी
हिंजवडी, ता. २१ : येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत देशभरातून आठशे खेळाडू सहभागी झाले आहेत. एकूण वीस प्रकारात स्पर्धा होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते याचे उद्घघाटन झाले. त्या म्हणाल्या, ‘‘शारीरिक कसरत स्वतः साठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण फिट अन सुरक्षित राहू शकतो. कराटे, व्यायाम आणि मेहनतीची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे.’’ यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती हुलावळे, मुळशीच्या माजी सभापती कोमल साखरे, बाबाजी शेळके, गणेश गायकवाड, संदीप जाधव, समीर बुचडे, कुंडलिक जांभूळकर आदी उपस्थित होते. सुरेश हुलावळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सागर साखरे, माजी सरपंच दत्तात्रेय साखरे, नंदकुमार भोईर, माजी उपसरपंच गणपत जगताप, योगेश शिंदे, अशोक वेताळ यांनी नियोजन केले आहे.