अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण सुरु

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण सुरु
Published on

पिंपरी, ता. १४ ः जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे व शिक्षण विभाग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, समग्र शिक्षा अंतर्गत शहरातील १ हजार १०० शिक्षकांना पहिल्या तीन टप्प्यात अध्ययन प्रक्रिया विषयक व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणास नुकतीच सुरुवात झाली.
पिंपरी व आकुर्डी शहर साधन केंद्र कार्यक्षेत्रातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाच्या आदिवासी व समाजकल्याण विभागाच्या शाळांमधील इयत्ता १ ते ५ वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या १०० टक्के शिक्षकांना पहिल्या तीन टप्प्यात १३ ते १६ डिसेंबर, १९ ते २३ डिसेंबर आणि २६ ते ३० डिसेंबर दरम्यान अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कै. वसंतदादा पाटील मनपा शाळा आकुर्डी, येथे आकुर्डी शहर साधन केंद्रातील शाळेसाठी आयोजित करण्यात आले आहे. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील मनपा शाळा जुना ‘ड’ प्रभाग येथे पिंपरी विभागातील शाळेसाठी आयोजित करण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यात २ ते ६ जानेवारी २०२४ आणि ९ ते १३ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग, मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे. मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे. मुलांना शिकण्यास आव्हाने देणे, भविष्यातील शिक्षण या विषयावर प्रशिक्षण घेतले जाणार आहे. मनपा शाळा व १०० खासगी अनुदानित शाळेतील इयत्ता १ ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com