मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३ ः तळेगाव शहराला होणारा पाणीपुरवठा अनियमित असून तो सुरळीत करावा तसेच अन्य नागरी सुविधांच्या मागणीसाठी फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. २) नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम, माजी नगरसेवक अरुण माने, सामाजिक कार्यकर्ते जमीर नालबंद, शहर भाजपचे अध्यक्ष अशोक दाभाडे, माजी अध्यक्ष रवींद्र माने, माजी नगरसेवक दिलीप खळदे, गोपाळ परदेशी, सचिन भांडवलकर, शोभा परदेशी, विशाल पवार, दिलीप चौधरी, किरण साळवे, महेश कदम, बाळासाहेब शेडगे, नवनाथ कुल आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. अरुण माने, जयंत कदम, आणि अशोक दाभाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांनी समस्येचा पाढा वाचला. मूलभूत सुविधाही वेळेवर मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेरीस मुख्याधिकारी पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी उपोषण मागे घेण्यात आले. मुख्याधिकारी पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब जांभूळकर यांनी पाणी प्राशन केले. दरम्यान, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पंधरा दिवसानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.