ताथवडेतील ‘ग्लोबल’मध्ये 
मॉडेल संयुक्त राष्ट्रसंघ परिषद

ताथवडेतील ‘ग्लोबल’मध्ये मॉडेल संयुक्त राष्ट्रसंघ परिषद

Published on

पिंपरी, ता. ४ ः डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ताथवडे येथील ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटरमध्ये मॉडेल संयुक्त राष्ट्र संघ परिषद आयोजित केली होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आयोजित परिषदेत ‘सुरक्षा परिषद’, ‘जी-२०’, ‘अखिल भारतीय राजकीय पक्षांची बैठक’ आणि ‘जगभरातील शरणार्थीच्या समस्या’ आदी विषयांवर चर्चा व परिसंवाद झाले. विविध महाविद्यालयांतील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. चेतन चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. परिषदेचे महासचिव जिगिषा साळुंखे, बीबीए विभाग प्रमुख आणि परिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत कलशेट्टी, डॉ. स्नेहल महेशकर, महासंचालक अनुली रोकडे आदी उपस्थित होते. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस पारितोषिक देऊन गौरविले.

फोटोः 80580

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.