धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवारी 
‘सकाळ’ संगे, सूरसंध्या रंगे’

धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवारी ‘सकाळ’ संगे, सूरसंध्या रंगे’

Published on

पिंपरी, ता. ३ ः दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा उत्सव. तो उत्साह द्विगुणित करण्यासाठी शुक्रवारी (ता. १०) ‘सकाळ माध्यम समूह’ घेऊन येत ‘सकाळ’ संगे, सूरसंध्या रंगे’ हा संगीतमय कार्यक्रम. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत कार्यक्रम होईल.
वसूबारस ते भाऊबीज असा साधारण सहा दिवस दिवाळी सणाचा कालावधी होतो. प्रत्येक सणाचे वेगळे महत्त्व आहे. जणू सणांची मांदियाळीच दिवाळीत असते. त्यातील ‘धनत्रयोदशी’चे महत्त्व धनसंपदा आणि आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेद अर्थात धन्वंतरी देवतेशी निगडीत असतो. या धनत्रयोदशीलाच ‘सकाळ’तर्फे आयोजित आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रायोजित ‘सकाळ’ संगे, सूरसंध्या रंगे’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये गायक जितेंद्र अभ्यंकर, योगिता गोडबोले, संदीप उबाळे, स्वप्नजा लेले यांचे गायन होईल. प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचे नृत्य होईल. चित्रा खरे यांचे निवेदन असेल. विक्रम भट, केदार मोरे, अभिजित भदे, मंदार देव आणि दर्शना जोग यांचे संगीत संयोजन आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ः किरण - ७३८७०९८८९७
लोगो ः ८०६६८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.