प्रस्तावित कचरा डेपो विरोधात उद्या दुचाकी फेरी

प्रस्तावित कचरा डेपो विरोधात उद्या दुचाकी फेरी

Published on

पिंपरी, ता.३ ः पिंपरी चिंचवड को-ऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित पुनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी (ता.५) सकाळी साडे दहा वाजता दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे.
या फेरीला १८ लैटीट्यूड मॉल (पुनावळे) येथून सुरूवात होईल. तसेच फेरी झाल्यानंतर लगेचच पुनावळे फॉरेस्ट (काटे वस्ती) येथे चिपको आंदोलन (वृक्ष तोडी विरोधात झाडांना आलिंगन देणे) करण्यात येणार आहे. आंदोलनात पुनावळे, ताथवडे, मारुंजी, जांबे, हिंजवडी, लाइफ रिपब्लिक टाऊनशिप, वाकड या परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.