पंतप्रधान कार्यालयाकडून 
बोऱ्हाडेंच्या पत्राची दखल

पंतप्रधान कार्यालयाकडून बोऱ्हाडेंच्या पत्राची दखल

पिंपरी, ता. ३ : वाढत्या कर्करोग रुग्णांबाबत चिंता व्यक्त करीत, या रोगावर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी करण्याबाबतचे पत्र निगडीतील यमुनानगर येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम बोऱ्हाडे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ज्याप्रमाणे आपण कोरोनावर विजय मिळवला, पोलिओसह इतर आजारांबाबत आपण व्यापक अभियान राबवून जिंकत आहोत, त्याचप्रमाणे कर्करोगाबाबतही व्यापक अभियान राबवावे, असेही पत्रात म्हटले आहे. या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दाखल घेण्यात आली.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अधिकारी विनोद शर्मा यांनी बोऱ्हाडे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा रोगांवर नियंत्रण मिळविण्यासह आवश्यक असलेल्या उपाययोजना राबवण्यासाठी राज्यांना तांत्रिक व आर्थिक मदत पुरवणे, आरोग्य प्रचार, आयुष्मान भारत हेल्थ वेलनेस सेंटर योजनेअंतर्गत तीस वर्षापेक्षा अधिक व्यक्तींचे स्क्रीनिंग, तात्काळ निदान, उपचार आदी सुरु आहे. यासह आणखी व्यापक उपाययोजना राबवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com