Shivsena: रक्षाबंधन व शिवबंधन, इरफान सय्यद म्हणजे कामगार चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व

Shivsena: रक्षाबंधन व शिवबंधन, इरफान सय्यद म्हणजे कामगार चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व

अण्णासाहेब पाटील यांच्या पश्‍चात माथाडी कामगार चळवळीत गुंडगिरी प्रवृत्तीचा शिरकाव झाला. त्याचा परिणाम पिंपरी-चिंचवडमधील कामगार क्षेत्रावरही झाला. गुंडगिरी फोफावल्याने कामगारांना कोणीच वाली राहिला नव्हता. ही परिस्थिती कामगार नेते इरफान सय्यद यांना रुचली नाही. त्यांनी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून माथाडी कामगारांना एकत्रित करून त्यांना हक्क मिळवून द्यायला सुरुवात केली. प्रसंगी पदरमोड करून कामगारांच्या पाठीचा कणा ताठ ठेवण्याचे काम या धडाडीच्या कामगार नेत्याकडून केले जाते आहे. शहर शिवसेना वाढवण्यात मोलाची कामगिरी केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपनेते व राज्य कार्यकारणी मध्ये महत्त्वाचे पद देऊन पक्ष संघटन वाढवण्याची जबाबदारी त्यांना दिली. अल्पसंख्याकाचा आश्वासक चेहरा म्हणुन त्यांच्याकडे पाहील जातय.

इरफान सय्यद, उपनेता, शिवसेना शिंदे गट

कामगार चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व
इरफान सय्यद यांचा जन्म एका मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात झाला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी हॉटेल व बांधकाम व्यवसाय निवडला. या शहरातील अनेक चांगल्या वाईट घटना तसेच कष्टकरी कामगारांच्या संघर्षाची अनेक आंदोलने, लढे त्यांनी जवळून पाहिले आहेत. सामान्य कुटुंबातील व कामगार वर्गातील समस्या सोडविण्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ निर्माण झाली. त्यांनी व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने महाराष्ट्र मजदूर संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील कामगार क्षेत्रातील व माथाडी, मापाडी, बांधकाम व जनरल कामगार या तसेच महाराष्ट्र राज्य मजदूर संघटना अविरत झटत आहे. या संघटनेमार्फत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्यप्रणालीमुळे प्रभावित होऊन आतापर्यंत सुमारे सोळा हजारांहून अधिक सभासद झाले आहेत. कामगारांचे प्रश्न सामोपचाराने सोडवून कामगार व व्यवस्थापन या दोघांचा विश्वास संपादित केल्यामुळे महाराष्ट्र मजदूर संघटना यशस्वी घोडदौड करीत आहे.

बांधकाम मजुरांचेही संघटन
माथाडी कामगारांसाठी ज्या पद्धतीचे काम उभे झाले ते पाहून बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी काही तरी करावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्‍त केली. बांधकाम क्षेत्रातील कामगारांची बिकट अवस्था पाहून या अपेक्षेला प्रतिसाद द्यावा लागला. त्यातूनच माथाडी, मापाडीसोबत बांधकाम व जनरल कामगारांचे संघटन सुरू झाले. दीड हजार बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे शासनाचे अनुदान मिळवून दिले.

सदैव टिकवला स्वाभिमान
कामगारांचे नेतृत्व करताना कामगारांच्या हिताशी कधीच तडजोड केली नाही. कामगारांसमोर जी भूमिका मांडली तीच भूमिका त्यांच्या व्यवस्थापनासमोर कायम ठेवली. सामोपचाराने प्रश्‍न मिटला पाहिजे हा आग्रह त्यांनी कायम धरला. मात्र, सामोपचार म्हणजे कमकुवत नाही हेही वेळोवेळी ठासून सांगितले, सिद्ध केले. त्यामुळेच हजारो कामगारांचा सन्मान आणि स्वाभिमान कायम ठेवता आला.

आंदोलनांच्या माध्यमातून डरकाळी
आंदोलने उभी करण्यास मागे-पुढे पाहिले नाही. केएसबी चौकातील ग्रेडसेपरेटरला कै. अण्णासाहेब पाटील यांचे नाव द्यावे, इंधन दरवाढ, कामगारांच्या विविध प्रश्‍नांसाठी विविध प्रसंगी आंदोलने केले. कामगार मेळाव्यांचे वेळोवेळी आयोजन केले.

शिवसेनाप्रमुख हे दैवत
कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्य पाहून अनेक राजकीय पक्षांच्या त्यांना ऑफर आल्या. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव लहानपणापासून असल्याने शिवसेना या पक्षाशिवाय अन्य कोणाचाही कधीच विचार केला नाही आणि यापुढेही करणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.

राजकीय पाठबळ गरजेचे
केलेल्या कामाला शिवसेनेसारख्या खंबीर पक्षाचे आणि नेत्यांचे पाठबळ लाभले. कामाची दखल जनतेने आणि पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांनी घेतली आहे. या कामांमुळे जनतेच्या मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत.

साद सामाजिक कार्याची
समाजाबद्दल ओढ ही जन्मजात त्यांच्या रक्तात भिनलेली. सामाजिक क्षेत्रात आणखी कार्य जोमात करण्यासाठी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने ‘साद सोशल फाउंडेशन’ची स्थापना केली. साद संस्थेच्या माध्यमातून कामगारांसाठी विविध उपक्रम राबविताना समाजातील सर्वच घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. वंचित घटकातील विद्यार्थी यांना न्याय देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरवर्षी ते पाठपुरावा करतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील चुकीच्या कामांना वेळोवेळी विरोध करून करदात्या नागरिकाच्या कररुपी पैशाचे योग्य नियोजन करण्यास पालिका प्रशासनाकडे त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.


रक्षाबंधन व शिवबंधन
प्रत्येक घटकात कार्यरत असणाऱ्या माझ्या प्रत्येक बहिणींसाठी रक्षाबंधन म्हणजेच शिवबंधनाचा अनोखा कार्यक्रम राबविला. कुटुंब संस्कृती टिकवून समाजात स्वत:ला सिद्ध करताना वकील, डॉक्टर, नर्स, पोलिस, शिक्षक, कचरावेचक, कामगार व इतर क्षेत्रात काम करून सामाजिक बांधिलकी जपत एकप्रकारे समाजसेवा करत अनेक भगिनी आपला आदर्श इतर स्त्रियांसमोर ठेवत आहेत. अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या भगिनींना शिवबंधनाची राखी भेट इरफान सय्यद यांच्याकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com