एकाची ऑनलाइनद्वारे पावणे तेरा लाखांची फसवणूक

एकाची ऑनलाइनद्वारे पावणे तेरा लाखांची फसवणूक

ऑनलाइनद्वारे एकाची
पावणे तेरा लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. १० : गुगल लोकेशन रिव्ह्यूजवर पैसे देण्याचे आमिष दाखवून एकाची ऑनलाइनद्वारे बारा लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार वाकड येथे घडला आहे.
संजय दशरथ अमृतकर (रा. स्कायलाईन सोसायटी, वाकड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जेम्स नामक टिचर, पूजन नावाचा व्यक्ती व प्रिशा नावाची महिला यांच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला, त्यामध्ये गुगल लोकेशन रिव्ह्यूजमध्ये तुम्हाला दिवसातून एक ते दोन तास द्यायचे आहेत, त्या मोबदल्यात एका रिव्ह्यूजचे १५० रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादीला टेलीग्राम अकाउंट सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर २४ टास्क खेळण्यास सांगत
गुगल रिव्ह्यूज घेऊन त्यामध्ये पैसे भरल्यास जास्त रक्कम परत भेटण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर २१ टास्क खेळल्यानंतर त्यांनी फिर्यादीला १५ हजार भरण्यास भाग पाडले. पुढे एक लाख २० हजार, ३ लाख ५० हजार, त्यानंतर ८ लाख असे एकूण १२ लाख ८५ हजार रुपये घेतले. याचा कोणताही परतावा अथवा मोबदला न देता फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक करून या रकमेचा अपहार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com