एमआयडीसीकडून सोमवारी 
पाणीपुरवठा बंद

एमआयडीसीकडून सोमवारी पाणीपुरवठा बंद

पिंपरी, ता. २२ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील शुध्द पाणी पुरवठा केंद्रामधील देखभाल व दुरुस्ती विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामकाजाकरिता सोमवारी (ता. २४) रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत होणारा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच मंगळवारी (ता. २५) रोजी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. तरी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सी.एम.ई., आर अॅन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल. कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओ.एफ.डी.आर. या भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक तो पाण्याचा साठा अगोदर करून ठेवावा व महामंडळास सहकार्य करण्याचे आवाहन चिंचवड एमआयडीसी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com