senior citizens
senior citizenssakal

Police Ward : ज्येष्ठ नागरिकांना पोलिस कक्षाचा आधार

दारू व प्रॉपर्टीसाठी पोटचा मुलगा वारंवार त्रास द्यायचा, रात्रंदिवस सतत होणाऱ्या त्रासामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे असह्य झाले होते.
Summary

दारू व प्रॉपर्टीसाठी पोटचा मुलगा वारंवार त्रास द्यायचा, रात्रंदिवस सतत होणाऱ्या त्रासामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे असह्य झाले होते.

पिंपरी - दारू व प्रॉपर्टीसाठी पोटचा मुलगा वारंवार त्रास द्यायचा, रात्रंदिवस सतत होणाऱ्या त्रासामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे असह्य झाले होते.अखेर त्यांनी पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे मदत मागितली. तेथील पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला बोलावून घेत त्याचे समुपदेशन केले. वडिलांना त्रास दिल्यास होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली. वेळोवेळी पाठपुरावा करून ज्येष्ठ नागरिकाला आधार दिला. अखेर मुलाकडून होणाऱ्या त्रासातून चिंचवडमधील दळवीनगर येथील ७० वर्षीय वडिलांची कायमची सुटका झाल्याचे ते सांगतात. या प्रकारेच अडचणीत असलेल्या अनेक ज्येष्ठांना पोलिसांच्या या कक्षाकडून आधार दिला जात आहे.

ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन
घरातील ज्येष्ठांना घरातून बाहेर काढणे, औषधोपचार, अत्यावश्यक जीवनोपयोगी गरजांपासून त्यांना वंचित ठेवणे, असे गंभीर प्रकार घडतात. त्यावेळी ज्येष्ठांना मदतीची गरज असते. तसेच मुले बाहेरगावी असल्याने एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीची गरज असते. अशाप्रकारे अडचणीत सापडलेल्या ज्येष्ठांच्या मदतीसाठी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १० फेब्रुवारी २०२० रोजी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या कक्षाचे समन्वयक अधिकारी सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र होनराव, अंमलदार राजाराम शेळके, सारिका पाटील हे कामकाज पाहतात.

दाखल झालेल्या तक्रारी
वर्ष अर्ज प्राप्त अर्ज निपटारा

२०२२ १५२ ३७
२०२३ १४० १४


चाळीस ४० प्रकरणात तडजोड
कक्षाद्वारे २०२२ ते २०२३ या वर्षात चाळीस प्रकरणात तक्रारदार व त्यांचे विरोधी यांना एकत्र बोलावून चर्चा विनिमय करून तडजोड करण्यात आली. तसेच २२६ ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

कामकाजाचे स्वरूप
- ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तींना या कक्षात बोलावून त्यांच्यातील समज-गैरसमजांवर समुपदेशन
- तक्रार मुले, सुना व नातवंडे यांच्या संबंधित असल्यास त्यांना एकत्रितरीत्या बोलावून त्यांच्यात चर्चा घडवून आणली जाते
- तक्रारदाराचे पूर्ण समाधान झाल्याची खात्री झाल्यावरच त्यांची तक्रार दफ्तरी दाखल
- एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती संकलित करून काही दिवसांनी त्यांची घेतली जाते भेट
- ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा फायदा घेऊन समाजातील इतर घटकांकडूनही आर्थिक फसवणूक झाल्याच्या येतात तक्रारी
- अशा प्रकरणात प्राथमिक विचारपूस करून संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार देऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात येते

हेल्पलाइन क्रमांक १०९०
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व सोयीसाठी १०९० हा हेल्पलाइन नंबर २४ तास सेवा सुरू आहे. तसेच पोलिस स्टेशन व ज्येष्ठ नागरिक कक्ष यांच्यात माहितीची देवाणघेवाण होण्यासाठी काही व्हाट्सअप ग्रुपही बनवले आहेत.

‘‘ज्येष्ठ नागरिकाला तत्काळ मदत पोचवण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. अनेक प्रकरणात ज्येष्ठांना आधार दिला आहे. ज्येष्ठांची काही तक्रार असल्यास कक्षाशी संपर्क साधावा.’’
- पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त तथा समन्वयक-ज्येष्ठ नागरिक कक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com