तहसीलदार कार्यालय समस्यांच्या विळख्यात
कमी मनुष्यबळ ः कार्यालयासाठी जागा अपुरी, पार्किंगवरून वादावादीचे वाढते प्रकार

तहसीलदार कार्यालय समस्यांच्या विळख्यात कमी मनुष्यबळ ः कार्यालयासाठी जागा अपुरी, पार्किंगवरून वादावादीचे वाढते प्रकार

पिंपरी, ता. २९ : शहरातील अप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत विस्तारलेल्या ३० गावांतील लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्यात तहसील कार्यालयाला जागा मिळूनही पुन्हा भाडेतत्वावरील अपुऱ्या जागेत संघर्ष करावा लागत आहे. पाच शासकीय कार्यालयांची जागा एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांचा गोंधळ उडत आहे. तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या दैनंदिन टपालांची संख्या सरासरी ७५० असून रेकॉर्ड ठेवण्यासाठी कार्यालयाला सध्या जागा अपुरी पडत आहे. शिवाय, उपलब्ध मनुष्यबळापैकी इतर क्लार्कदेखील दुसऱ्या कामासाठी वर्ग करण्यात आल्याने दैनंदिन कामकाजाचा ढिगारा वाढत असल्याचे समोर आले आहे.

शहराच्या लोकसंख्येने ३० लाखांचा आकडा गाठला आहे. सध्या पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाचा भाग हा देहू-आळंदी ते चोविसावाडी व चिंचवड ते दापोडीपर्यंत विस्तारलेला आहे. सध्या कार्यालयाचे मनुष्यबळ एकूण १२ असून, त्यातीलही ३ क्लार्क गेल्या दीड वर्षांपासून इतर कामासाठी वर्ग केले आहेत. पीएमआरडीएच्या जागेत सध्या तहसील कार्यालयासाठी करार तत्त्वावर जागा मिळाली असून त्याचा करार पूर्ण झालेला नाही. या ठिकाणी फ क्षेत्रिय कार्यालय, पीएमआरडीएचे लॉटरी विभाग, सबरजिस्टार आणि तहसिल कार्यालय एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे, नागरिक या ठिकाणी प्रवेश केला की, गोंधळून जातात. तर, दुचाकी व चारचाकी लावण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, हमरीतुमरीचे प्रकार पार्किंगवरुन घडत आहेत.

तहसील कार्यालयाचा रॅम्प धोकादायक आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच, महिला व लहान मुलांना या ठिकाणांहून पायऱ्या चढून जाता येत नाही. अपघात होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झाला आहे. नागरिकांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. दाखले व इतर कामकाजासाठी ताटकळत उभे राहून प्रतिक्षा करावी लागत आहे.
--
सरासरी ७५० टपाल तहसील कार्यालयात येत असून, त्यातील १७५ ते २०० टपाल हे दाखल्यांचे असून डोमिसाईल, रहिवासी प्रमाणपत्र, जात व इडब्लूएस प्रमाणपत्रांचे अर्ज ३५० पर्यंत आहेत. उत्पन्नाचे दाखले सहीसाठी नायब तहसीलदार तर, इतर सर्व दाखले सहीसाठी तहसीलदारांकडे येत असतात. त्यामुळे, दैनंदिन कामकाजाचा निपटारा करणे गरजेचे आहे. दस्ताऐवज व अभिलेखांसाठी पुरेशी जागा नसल्याने रेकॉर्ड कसेबसे तहसील कार्यालयात जमविले आहे. जागा अपूर्ण असल्याने हे रेकॉर्ड सुरक्षित राहील याची खात्री नाही. रेकॉर्ड ठेवण्यासाठी रॅक उपलब्ध नाहीत. त्यामुळे, रेकॉर्ड जमिनीवर ठेवलेले आहेत.
--
जानेवारी ते मार्चअखेरपर्यंतचे आलेले टपाल : २३१८
दैनंदिन सरासरी प्रमाणे येणारे टपाल : ७५०
--
सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ :
तहसीलदार : १
नायब तहसीलदार :१
क्लार्क : ५
अव्वल कारकून : २
--
रावेत शिंदे वस्ती या ठिकाणी कार्यालयीन जागेसाठी पाठपुरावा सुरु आहे. विधानमंडळातही या १ गुंठे जागेकरिता प्रस्ताव मांडला आहे. पार्किंगसाठी जागा अपुरी आहे. नागरिकांना बसण्यासाठी सुविधा नाहीत. जून-जुलैतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी
लवकरच शाळांमध्ये दाखल्यांकरिता कॅम्प भरविले जाणार आहेत.
- अर्चना निकम, अप्पर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी
--
फोटोः 40065

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com