फोर्स मोटर्सच्या एम्प्लॉईज संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर पाटील

फोर्स मोटर्सच्या एम्प्लॉईज संस्थेच्या 
अध्यक्षपदी किशोर पाटील

पिंपरी, ता. २९ : आकुर्डीतील, विवेकगरमधील फोर्स मोटर्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड संस्थेच्या संचालक मंडळाची २०२३ ते २०२८ या कालावधीची निवडणूक झाली. सहकार पॅनेलला बहुमत मिळाल्याने किशोर पाटील यांची संस्थेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी दिलीप काशीद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणुकीत सहकार पॅनेल, जयहिंद फोर्स विकास पॅनेल व वैयक्तिक तीन उमेदवार अशी एकूण २१ उमेदवार होते. मतमोजणीनंतर अकरा उमेदवार निवडून आले. निवडणुकीत सहकार पॅनेलचे ८ व जयहिंद फोर्स विकास पॅनेलचे तीन उमेदवार निवडून आलेले असून सहकार पॅनेलला सर्वसाधारण मतदार संघातून बहुमत मिळाले आहे.
सहकार पॅनेलमधून किशोर पाटील, अतुल बोरा, गजानन काटकर, दिलीप काशीद, दिलीप कावळे, दिनेश शिंदे विजयी झाले आहेत. तर, जयहिंद फोर्स विकास पॅनेल मधून भरत शिंदे, शरद शिंदे, नवनाथ देवकर यांची निवड झाली आहे. अविरोध निवड (सहकार पॅनेल) महिला राखीव मतदार संघामधून सीमा भारंबे, नयना बनसोडे विजयी झालेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार खात्याच्या वतीने सहकारी अधिकारी संतोष शिंगाडे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com