परांजपे विद्यालयात सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन उत्साहात

परांजपे विद्यालयात सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन उत्साहात

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २ : ॲड. पु.वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये अमृत महोत्सवी वर्ष, महाराष्ट्र दिन व सौरऊर्जा प्रकल्प उद्‍घाटन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण महर्षी, मावळ भूषण आदरणीय कृष्णरावजी भेगडे यांच्या मार्गदर्शनातून ॲड. पु. वा परांजपे विद्या मंदिरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आला. ध्वजवंदन व प्रकल्पाचे उद्‍घाटन संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश बवरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, संचालक महेश भाई शहा, दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे शालेय समिती सदस्य अशोक काळोखे, आनंद भेगडे, पत्रकार प्रभाकर तुमकर, रमेश जाधव गुरुजी, माजी विद्यार्थी अंकुश गुंड, दीपक अवसरकर उपस्थित होते.
सौर ऊर्जा ही काळाची गरज आहे असे अविनाश बवरे यांनी मनोगतातून व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी या नात्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्याची व ध्वजवंदन करण्याची संधी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ अध्यापिका अनिता नागपुरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com