सेवानिवृत्तीनिमित्त रिकामे यांच्याकडून
सामाजिक संस्थांना आर्थिक मदत

सेवानिवृत्तीनिमित्त रिकामे यांच्याकडून सामाजिक संस्थांना आर्थिक मदत

Published on

पिंपरी, ता. ३ ः महापालिका सेवेतून भांडारपाल पदावरून निवृत्त झालेले भास्कर रिकामे यांचा त्यांच्या आप्तेष्टांनी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ सभागृहात सन्मान केला. माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारती फरांदे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शांताराम भालेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्कप्रमुख मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते. तळेगाव दाभाडे येथील संजीवनी मुलींचे वसतिगृह, हुतात्मा नाग्या कातकरी समाज विकास केंद्र व वसतिगृह, पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण केंद्र, आकुर्डी येथील आधार केंद्र, नगर जिल्ह्यातील धुमाळवाडी येथील आनंद आश्रम, या संस्थांना प्रत्येकी दोन हजार रुपये आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाला पाच हजार रुपयांचा निधी रिकामे यांनी दिला. मनीषा हिंगणे आणि श्रीकांत मापारी यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.