Nature Nane Maval
Nature Nane Mavalsakal

Nature Nane Maval : निसर्ग अनुभवायचाय; तर चला नाणे मावळला

धुक्याने वेढलेला भाग अन् धरण, धबधबे अन् प्राचीन मंदिरांची सफर

टाकवे बुद्रुक - मान्सूनला सुरवात झालीय आणि मावळची सफर करायची नाही असं म्हणून कसं चालेल. गडकिल्ले, प्राचीन लेण्या, सह्याद्रीच्या भव्य रांगा, त्यातूनच वाट काढणारे मोठं-मोठे धबधबे, धरणे, प्राचीन मंदिरे पाहण्याचा आनंद पावसाळी हंगामात घेतलाच पाहिजे ना आणि ही सर्व ठिकाणे आहेत.

आमच्या बारा मावळपैकी नाणे मावळ, आंदर मावळ आणि पवन मावळ भागातील. त्यातच पर्यटकांचा पवन मावळ हा भाग जास्तच परिचयाचा आणि पसंदीचा. नाणे मावळ आणि आंदर मावळ हा भाग अनेक पर्यटकांचा अपरिचित भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. सद्यस्थितीत धुक्याने वेढलेला नाणे मावळ हा भाग निसर्गाचा आनंद देण्यासाठी तयार झाला असून, पर्यटकांनी व निसर्गप्रेमींनी या नाणे मावळची सफर जरूर अनुभवायला हवी.

काय पाहाल?

वडिवळे धरण

- १९९५ मध्ये बांधकाम पूर्ण झालेले व १९९९ मध्ये पाणीवापरासाठी खुले केलेले शासकीय धरण

- वडिवळे धरणातून आळंदी आणि देहू तीर्थक्षेत्रांना पाणीपुरवठ्याचे ठिकाण

- नाणे मावळातील अनेक गावांना वरदान लाभलेले धरण पर्यटकांना लांबून पाहण्यासारखे आहे

दुर्लक्षित पाले-उकसाण लेणी

- पाले व उकसाण लेणी हे वर्षाविहारासह भटकंतीसाठी दर्जेदार, पुरातन परंतु दुर्लक्षित घटक

- मावळात गडकिल्ल्यांसह पुरातन लेण्यादेखील इतिहासाला घालताहेत साद

- पाले व उकसाण गावच्या लेण्यांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल

- पालेच्या अर्धवट कोरलेल्या लेणीमधील गुहेत एक विहार व बसण्यासाठी एक सज्जा कोरलाय

- गुहेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एक शिलालेख आहे, त्याची सुरुवात ‘नमो अरिहंता नं’ अशी

व्हिलेज औटिंग

- ग्रामीण संस्कृतीच दर्शन घडविणारे व कृषी पर्यटनाचा भाग असलेले ठिकाण

- शहरातील नागरिकांना चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल आणि ग्रामीण संस्कृती अनुभवायची असेल तर येथे नक्की या

- टेन्ट कॅम्पिंग, कॅम्पिंग समोर विहीर, बांधलेली बैलजोडी व गोठा, पटांगणात चरणाऱ्या कोंबड्या, जमिनीवर बसून जेवणाची पद्धत, चुलीवर बनवलेलं गावरान पद्धतीचं शाकाहारी व मांसाहारी जेवण, बैलगाडीतून फेरी, जंगल ट्रेकिंग याचा अनुभव

कोंडेश्वर मंदिर

- नाणे मावळातील शेवटच्या टोकावर विसावलेल्या जांभवली गावातील प्राचीन मंदिर

- इतिहासाचे वारसा जपणारे हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान

- मंदिर शिवकालीनपूर्व असून छत्रपती शिवाजी महाराज भीमाशंकरला दर्शनासाठी जाताना कोंडेश्वर इथे मुक्काम केला असल्याचे इतिहासकार सांगतात

- निसर्गात सानिध्यात वसलेले हे मंदिर व धुक्याने वेढलेला येथील परिसर पाहण्यासारखाच

ढाक बहिरी ट्रेक

- ढाकचा बहिरीचा अर्थ ढाकचा किल्‍ला

- डोंगरात वसलेला आदिवासींचा देव बहिरी, त्‍याच्‍या नावावरून तो किल्‍ला ‘ढाकचा बहिरी’ या नावाने ओळखला जातो

- सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हा गड इतिहास प्रेमी, गिर्यारोहक, साहस प्रेमी यांना आकर्षित करणारा

- जांभवलीतून जंगलवाट पकडून हा ट्रेक सुरू होते

- कातळकडा पाहण्याजोगा

- कातळकडा चढताना दोरखंडाचा वापर करून ढाक बहिरी लेणीत पोहचता येते

- तिथे बहिरी देवाचे छोटेसे मंदिर असून अनेक भाविकांचे श्रद्धास्थान

- सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील कातळ हा चिकट व निसरडा झाला आहे, त्यामुळे शक्यतो ढाक बहिरी हा ट्रेक टाळा.

कसे जाल?

- कामशेतवरून नाणे गाव मार्गी वडिवळे धरण हे बारा किलोमीटरवर

- कामशेत शहरातून नाणे मार्गे गोवित्री गावाच्या पुढे कुंडलिका नदीच्या अलीकडे उकसाण गावाकडे जाण्यासाठी खडकी फाटा तेथून पाले व उकसाण लेणी कडे रस्ता जातो

- कामशेतपासून या लेण्या चौदा किलोमीटरच्या अंतरावर

- वडिवळे धरणापासून सहा किलोमीटर अंतरावर थोरण गावाच्या अलीकडे विलेज औटिंग

- व्हिलेज औटिंगपासून पुढे अडीच किलोमीटरवर प्राचीन कोंडेश्वर मंदिर

- कोंडेश्वर मंदिरापासून दीड-दोन तास जंगलट्रेक करीत गेल्यावर आपणास कळकराय सुळका, ढाक बहिरी गड पाहता येतो.

खाण्याची सोय कुठे आहे?

- कामशेत या ठिकाणी अनेक हॉटेल व ढाबे आहेत, तेथून पार्सल नेऊ शकता किंवा पुढे अनेक ठिकाणी नाश्ता व चहाची सोय

- थोरण याठिकाणी व्हिलेज औटिंग येथे राहण्याची व खाण्याची सोय

- जांभवली या गावातही सांगितल्याप्रमाणे जेवण करून मिळेल

महत्त्वाचे...

- कामशेत शहर ते कोंडेश्वर मंदिर २१ किलोमीटर अंतर

- व्हिलेज औटिंग ते जांभवलीपर्यंत नेटवर्क प्रॉब्लेम

- आवश्यक वस्तू सोबत ठेवा

- जाताना वाटेत कुठेही पेट्रोल पंप नसल्याने जातानाच गाडीत कामशेत पेट्रोल पंपावरून इंधन भरून जा

- प्रथमोपचार किट सोबत ठेवा

- धोकादायक ठिकाणी जाण्याचा मोह टाळा

हेल्पलाइन

- कामशेत पोलिस ठाणे - ०२११४-२६२४४०

- आपत्ती व्यवस्थापन, मावळ - ९९६०९९६०९५

- शिवदुर्ग मित्र - ९८२२५००८८४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com