महापालिकेच्या २४ शाळांत
अभ्यासिका उपलब्ध होणार

महापालिकेच्या २४ शाळांत अभ्यासिका उपलब्ध होणार

Published on

पिंपरी, ता. ६ : विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी, महापालिकेच्या २४ शाळांमध्ये अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महापालिका शाळांमध्ये मध्यमवर्गीय व झोपडपट्टी भागातील मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रम घेतला. प्रत्येक महापालिका शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या कक्षात विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तके उपलब्ध असतात. मात्र, विद्यार्थी मुख्याध्यापकांच्या कक्षात जाण्यास टाळाटाळ करतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी, यासाठी महापालिकेच्या २४ शाळांमध्ये स्वतंत्र अभ्यासिका करण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकांचा समावेश असणार आहे. लवकरच अभ्यासिकेचे कामकाज पूर्ण होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली.
नागरिक, महिला, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठांना एखाद्या ठिकाणी बसून पुस्तके वाचता यावीत, यासाठी शहरात हक्काची अभ्यासिका नाही. तसेच शहरातील नागरिकांची वाचन संस्कृती वाढावी, या हेतूने महापालिकेच्या अत्याधुनिक सुविधा, पुस्तकांनी सज्ज अशी अभ्यासिका उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने जागेची चाचपणी सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.