‘ॲनिमेशन’मध्ये रोजगाराच्या भरपूर संधी ः भंडारे
‘पीसीयु’ आणि रिलायन्स ॲनिमेशन्स यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

‘ॲनिमेशन’मध्ये रोजगाराच्या भरपूर संधी ः भंडारे ‘पीसीयु’ आणि रिलायन्स ॲनिमेशन्स यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

Published on

पिंपरी, ता. ११ ः ‘‘गेल्या काही वर्षांत विज्ञान व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भरपूर प्रगती झाली आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये ॲनिमेशनचा वापर वाढला असून, हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲनिमेशन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. रिलायन्स ॲनिमेशन्सने भविष्यातील गरज ओळखून, ॲनिमेशनमध्ये नव नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे,’’ असे मत रिलायन्स ॲनिमेशन्सचे सीईओ तेजोनिधी भंडारे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु), साते मावळ येथील मुख्यालयात पीसीयु आणि रिलायन्स ॲनिमेशन्स यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी भंडारे बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, उप कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, डॉ. सागर भडंगे, प्रा. रुचू कुठयाला आदी उपस्थित होते.

डॉ. मनिमाला पुरी म्हणाल्या, ‘‘पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड विद्यापीठाने साते, मावळ येथील विस्तीर्ण जागेत काळाची गरज ओळखून संगणक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, औषध निर्माण शास्त्र आदी अनेक शैक्षणिक शाखा सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिलायन्स ॲनिमेशन्स यांच्याबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. येत्या काळात पीसीयुच्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.’’

डॉ. राजीव भारद्वाज यांनी पीसीईटीच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. पीजी ते पीएचडीपर्यंतचे शिक्षण पीसीईटीच्या महाविद्यालयांत उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, उप कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. रुचू कुठयाला यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सागर भडंगे यांनी आभार मानले.
--------
फोटोः 54388

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.