आखाड पार्टवर भाजप शहराध्यक्ष, आमदारांचा सुमारे ५ कोटींचा चुराडा!

आखाड पार्टवर भाजप शहराध्यक्ष, आमदारांचा सुमारे ५ कोटींचा चुराडा!

Published on

तब्बल सव्वा लाख लोकांची
भोसरीत रंगली आखाडपार्टी

पिंपरी, ता. १० : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना, कार्यकर्त्यांना ‘आखाड पार्टी’ साजरी करता यावी, यासाठी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात रविवारी (ता. ९) एकूण १३ ठिकाणी आयोजन केले होते. सुमारे १ लाख ३७ हजार जणांनी या पार्टीत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी तब्बल ४ टन मटण, २ टन चिकन फस्त करण्यात आले, असा दावा संयोजकांच्यावतीने करण्यात आला. राज्यातील ही ‘रेकॉर्डब्रेक’ आखाडपार्टी असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कोटीच्या कोटी उड्डाणे.....
आखाड पार्टीत एक लाख ३७ हजार जणांनी सहभाग नोंदवला आहे. एक प्लेट ३५० रुपयांना पकडली तरी नुसत्या सामिष जेवणाचेच ४ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये होतात. तर; शाकाहारींसाठी वेगळी सोय होती. एकूण सगळा थाट पाहता सुमारे ५ कोटी रुपये एका दिवसात खर्च झाले असावेत, अशी चर्चा शहरात आहे.

‘‘आषाढात मांसाहार करण्याची एक परंपरा आहे. मतदार संघातील गोरगरीब, कष्टकरी, चाकरमानी यांच्यासोबत एकत्रितपणे आखाड पार्टी करण्यासाठी आम्ही १५ वर्षांपासून सुरवात केली. त्याला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. आपुलकीने नागरिक या स्नेहभोजनासाठी सहभागी होतात, याचे समाधान वाटते.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी.
------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.