रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी निवृत्त जवान
महापालिका स्थायी समिती सभेचा निर्णय; ७७ जवान नियुक्त करणार

रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी निवृत्त जवान महापालिका स्थायी समिती सभेचा निर्णय; ७७ जवान नियुक्त करणार

पिंपरी, ता. ११ ः महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडील (मेस्को) ७७ जवानांची महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षारक्षकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा नव्याने करारनामा करणे व त्यासाठीच्या खर्चास स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी मान्यता दिली.
महापालिकेची जुलैची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीची साप्ताहिक सभा प्रशासक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे,उल्हास जगताप आदी उपस्थित होते. त्यात चिंचवडमध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय, सिटी ऑपरेशन व डिझास्टर रिकव्हरी सेंटर विकसित करणे, जेएनएनयुआरएम अंतर्गत लिंकरोड पत्राशेड पॅकेज ७ अ मधील इमारतींच्या दुरुस्ती, मोरवाडीतील रस्त्यांच्या कॉक्रीटकरणास अडथळा ठरणारे महावितरणच्या वीजवाहिन्या व खांब स्थलांतरित करणे, सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे, सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी यंत्रसामग्री पुरविणे, चक्रपाणी वसाहतीतील रस्ते, नवीन भोसरी रुग्णालय व महापालिकेच्या इतर इमारतींची देखभाल- दुरुस्ती करणे, वायसीएम रुग्णालयात स्थापत्य विषयक कामे करणे, ग प्रभागातील सांडपाणी वाहिन्या व वार्षिक साफसफाई करणे, नेत्ररोग विभागासाठी फ्रिज खरेदी करणे, शिक्षण व रुग्णालयांसाठी संगणक टेबल खरेदी करणे, मिळकतकर सवलत योजनेसाठी जनजागृती करणे, आरोग्य विभागासाठी बायोलॉजिकल मल्टिपर्पज रॅपिड ऑक्सिजनेटेड पावडर खरेदी करणे आदी खर्चास मान्यता देण्यात आली.

अन्य मंजूर विषय
- क्रांतिवीर चापेकर वाड्यात ऑडिओ-व्हिडिओ, प्रोजेक्शन मॅपिग व डिजिटलायझेशन कामासाठी सल्लागार नियुक्त करणे
- महापालिका दवाखाने, शाळा व सार्वजनिक इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे
- काळेवाडी पवनानगर, विजयनगर, शांतिनगर, आदर्शनगर, संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील सांडपाणी वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती
- मानधनावरील पदांना सुधारित किमान वेतनाप्रमाणे मानधन वाढविणे
- महापालिका शाळांमधून दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम ईसीएसद्वारे देऊन सत्कार करणे
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com