खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी
सीएसह चौघांना अटक

खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी सीएसह चौघांना अटक

Published on

पिंपरी, ता. ११ : जमीन खरेदी विक्रीच्या वादातून भागीदाराला मारण्यासाठी ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी
सनदी लेखापालासह (सीए) चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि ४० काडतुसे जप्त केली आहेत.
विवेक नंदकिशोर लाहोटी (वय ४२, रा. शाहूनगर, चिंचवड), सुधीर अनिल परदेशी (वय २५, रा. साई धाम सोसायटी, रा. वडगाव मावळ), शरद साळवी आणि एक महिला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी एका गुन्ह्यात आरोपी सुधीर परदेशी याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केली. लाहोटी याच्याकडे तपास करत असताना, त्याने त्याचा व्यावसायिक भागीदार राजू माळी यांना मारण्याची सुधीर परदेशीला ५० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले. त्यातून ही कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.