डॉ. महेश पवार

डॉ. महेश पवार

Published on

कर्करोगावर आधुनिक उपचार

कर्करोग हा अत्यंत दुर्धर आणि जीवघेणा आजार समजला जातो. मात्र, वेळेवर निदान आणि योग्य उपचारांनी त्यावर मात करता येऊ शकते. हाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पिंपळे सौदागर येथील ‘केअर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये केवळ कर्करोगग्रस्त रुग्णांवर सर्व प्रकारचे आधुनिक उपचार केले जात आहेत. रुग्णसेवेच्या दर्जात कोणतीही तडजोड न करता इथे परवडणाऱ्या दरात उपचार केले जात आहेत.
- डॉ. महेश पवार, सर्जिकल ॲंकोलॉजिस्ट (कॅन्सर सर्जन)

मुं बई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये कर्करोग निवारण विषयक प्रशिक्षण घेतल्यावर डॉ. महेश पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोग तज्ज्ञ म्हणून रुग्णांना सेवा देत आहेत. विविध प्रकारच्या कर्करोगावरील उपचारांचा वीस वर्षांपर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
आत्तापर्यंत त्यांनी ८ ते १० हजार रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. महेश पवार यांनी पिंपळे सौदागर येथे २०१३ मध्ये पाच खाटांचे कॅन्सर सेंटर सुरू केले. आज त्याचे २५ खाटांच्या सर्व आधुनिक सोयी-सुविधायुक्त ‘केअर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये रूपांतर झाले आहे. इथे सर्व प्रकारच्या कर्करोगविषयक शस्त्रक्रिया केल्या जातात. केवळ कर्करोगग्रस्त रुग्णांनाच केंद्रबिंदू मानून इथे त्यांच्या गरजेनुसार, शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपीसह सर्व प्रकारचे आधुनिक उपचार केले जातात. केमोथेरपी चालू असलेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता निर्माण होते. या हॉस्पिटलमध्ये केवळ कर्करोगग्रस्त रुग्णांनाच दाखल करून घेतले जात असल्यामुळे येथील रुग्णांना इतर कुठल्याही प्रकारच्या आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी राहतो.
‘केअर स्पेशालिटी हॉस्पिटल’ हे छोटेखानी हॉस्पिटल असले तरी जास्त खाटांच्या कॉर्पोरेट हॉस्पिटलप्रमाणे इथेही आधुनिक सोयी-सुविधा आणि रुग्णांच्या आरोग्याच्यादृष्टीने सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. कर्करोगात दीर्घकालीन उपचारांचा समावेश असतो. त्यात, अनेकदा शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन अशा वेगवेगळ्या उपचार रुग्णांवर करावे लागतात. यादृष्टीने, कॅन्सर सर्जन, केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचे डॉक्टर दर आठवड्यातून एकदा एकत्रितरीत्या रुग्णांची तपासणी करतात. त्यानुसार, उपचाराची पुढील दिशा निश्चित केली जाते.
सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, केमोथेरपीसाठी आठ खाटांचा स्वतंत्र विभाग हॉस्पिटलमध्ये आहे. केवळ उपचारच नव्हे तर आजाराचे लवकर निदान करण्यावरही इथे काम केले जात आहे. महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या स्तनाच्‍या कर्करोगासाठी हॉस्पिटलमध्ये थर्मोग्राफी उपकरणाच्या साह्याने ‘नो टच’ तंत्राने तपासण्या केल्या जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून वेळोवेळी विनामूल्य तपासणी शिबिरे भरविले जातात. रुग्णांवरील उपचाराचे दुष्परिणाम कमीत कमी होऊन उपचार अधिकाधिक परिणामकारक करता यावे, यादृष्टीने, वेदनारहित केमोथेरपी, इम्युनोथेरपी, लक्ष्यभेद उपचार (टार्गेटेड ट्रीटमेंट) असे अत्याधुनिक उपचारही रुग्णांना उपलब्ध करून दिले जातात.
रुग्णाचे केस गळू नयेत, यासाठी स्काल्प कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, स्तन न काढता शस्त्रक्रिया करणे किंवा तोंडाच्या कर्करोगासाठी ‘फ्री फ्लॅप’ नावाची प्लॅस्टिक सर्जरी अशा अत्याधुनिक शस्त्रक्रिया केल्या जातात. लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेमध्ये मोठी चिरफाड केली जात नाही. त्याने, रुग्णांना वेदना कमी होतात. तर प्लॅस्टिक सर्जरीमध्ये स्तनाची पुनर्रचना आणि तोंडाचे कार्य सुरळीत ठेवतानाच चेहऱ्याचे विद्रूपीकरण टाळता येते. याशिवाय, मानसिक पाठबळ, पोषण आहार विषयक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि पुनर्वसन यासारख्या सर्व प्रकारच्या सेवा रुग्णांना दिल्या जातात. सर्व प्रकारच्या मेडिक्लेमची सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
‘‘कर्करोग निश्चितच बरा होऊ शकतो. परंतु, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील कुठल्याही व्यक्तीला कर्करोग सदृश लक्षणे दिसून आल्यास केअर स्पेशालिटी हॉस्पिटलला जरूर भेट देता येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com