डॉ. राकेश प्रसाद

डॉ. राकेश प्रसाद

दातांच्या सौंदर्य वृद्धीसाठी साथ

हल्लीच्या काळात चेहऱ्याच्या सौंदर्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. तजेलदार, नितळ चेहऱ्याबरोबर, सुंदर दातही चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालत असतात. त्यामुळे, दातांचे आरोग्य नीट ठेवण्याबरोबरच त्यांचे सौंदर्य वृद्धिंगत करण्याच्यादृष्टीने, डॉ. आर. आर. प्रसाद डेंटल क्लिनिक कार्यरत आहे. क्लिनिकमधील सर्व तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ हे रुग्णसेवेसाठी समर्पित भावनेने काम करत आहे.
- डॉ. राकेश प्रसाद, BDS-GDC Mumbai, Dental Surgeon

का ही वर्षांपूर्वी, एखादा दात दुखायला लागला की, दातदुखीच्या समस्येने ग्रस्त असलेला व्यक्ती दंतचिकित्सकाकडे जात असे. परंतु, अलीकडच्या काळात दात निरोगी ठेवण्याबरोबरच दातांचे सौंदर्य राखणे आणि ते वृद्धिंगत करण्याकडेही कल दिसून येत आहे. त्यामध्ये, केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांमध्येही दातांच्या सौंदर्याबद्दल जागृती निर्माण झाली आहे.
दंतरोगाच्या समस्यांच्या निवारणाबरोबरच त्यांच्या सौंदर्यकरणासाठी मागील दोन दशकांहून अधिक काळ डॉ. आर. आर. प्रसाद डेंटल क्लिनिक हे कार्यरत आहे. आधुनिक उपकरणांच्या साह्याने तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत दंतरोग रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचे डॉ. आर. आर. प्रसाद डेंटल क्लिनिकचे ध्येय आहे. त्याला अनुसरुनच या क्लिनिकमध्ये गरजू रुग्णांना विविध शस्त्रक्रियांसह सर्व आवश्यक त्या सेवा दिल्या जात आहेत. दंतरोग चिकित्सा क्षेत्रात दंतरोग तज्ज्ञ डॉ. राकेश प्रसाद हे १९९६ पासून रुग्णांना सेवा देत आहेत.
पिंपरी स्टेशन रस्त्यावर त्यांचे डॉ. आर. आर. प्रसाद डेंटल क्लिनिक आहे. क्लिनिकमध्ये, निर्जंतुकीकरणाची सुविधा असलेल्या स्वतंत्र कक्षासह एकूण चार दंत चिकित्सा कक्ष कार्यरत आहेत. उच्च दर्जाची ‘डेंटल लॅब’, संपूर्ण तोंडाचा एक्स-रे काढण्याची सुविधा ऑर्थोपेंटोमोग्राम (ओपीजी), ‘डिजिटल रेडिओलॉजी’, ‘लेजर’, ‘डिजिटल स्कॅनिंग मशिन अशा आधुनिक सुविधा क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत.
सर्व प्रकारच्या दंतरोग चिकित्सा आणि उपचार क्लिनिकद्वारे रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये, प्रामुख्याने ‘रुट कॅनल’, ‘क्राऊन ॲण्ड ब्रिजेस’ (दातावर कॅप बसविणे), दंत सौंदर्य चिकित्सा आदींचा समावेश आहे. निरनिराळ्या प्रकारच्या तोंडाच्या शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या दातांच्या समस्या (दात किडणे), दात उजळविणे, वाकडे दात सरळ करणे यासारख्या इतर सेवाही पुरविल्या जातात. त्यासाठी पूर्णवेळ आॅर्थोडेंटिस्ट उपलब्ध आहेत. अलीकडे दात एकसारखे करणे सहज सोपे झाले आहे. २००४ पासून दंत प्रत्यारोपण सेवा रुग्णांना दिली जात आहे. रुग्णाला त्याच्या गरजेनुसार तोंडातील दातांची संपूर्ण नवीन कवळी बसविणे हे क्लिनिकच्या निरनिराळ्या उद्दिष्टांपैकी एक आहे. याशिवाय, दातांच्या समस्यांचे लेजरच्या साहाय्याने निराकरण करण्याचे कामही इथे केले जाते. अलीकडच्या काळात, तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्याचे लवकर निदान करता यावे, यासाठी क्लिनिकमार्फत विशेष निदान केले जाते. दातांचे सुयोग्य माप मिळविणे, उपचारापूर्वी आणि उपचारानंतरच्या स्थितीचे योग्य आकलन करण्याच्यादृष्टीने क्लिनिकद्वारे ‘डिजिटल स्कॅनर’चा वापर केला जात आहे. लवकरच निगडी प्राधिकरण येथील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ क्लिनिकची नवीन शाखा सुरू होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com