पवना नदी प्रदूषणप्रकरणी
लॉंड्री चालकाविरुद्घ गुन्हा

पवना नदी प्रदूषणप्रकरणी लॉंड्री चालकाविरुद्घ गुन्हा

Published on

पिंपरी, ता. २६ ः कपडे धुतल्यानंतरचे दूषित पाणी प्रक्रिया न करता उघड्यावर सोडल्याप्रकरणी लॉंड्री चालकाविरुद्घ मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिंचवडेनगर चिंचवड येथील विघ्नहर्ता क्लिअरन्स लॉंड्री ॲण्ड ड्रायक्लिनर्स सर्व्हिसेसचे मालक स्वप्नील ससे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महापालिका पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात पवना नदीच्या पाण्यावर १६ जुलै रोजी पांढरा फेस मोठ्या प्रमाणात आलेला होता. त्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर वाल्हेकरवाडी रस्त्यावरील चिंचवडेनगर येथील स्वप्नील ससे यांच्या विघ्नहर्ता क्लिअरन्स लॉंड्री ॲण्ड ड्रायक्लिनर्स सर्व्हिसेसमध्ये कपडे धुतल्यानंतरचे दूषित पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता उघड्यावर सोडलेले आढळले. या प्रकरणी त्यांना १८ जुलै रोजी नोटीस दिली होती. मंगळवारी (ता. २४) त्यांच्याविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.