गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या 
शिक्षणासाठी संगणक संच भेट

गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संगणक संच भेट

Published on

पिंपरी, ता. २६ ः आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षणासाठी, गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून लीगल डिपार्टमेंट, ग्रेट सॉफ्टवेअर लॅबोरेटरी, प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयास पाच संगणक संच व पाच लॅपटॉप भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, संस्थेचे प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, शालेय समितीचे अध्यक्ष अरुण नहार, प्रकल्प अधिकारी सुरेश साळुंखे, शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव, प्राचार्य दिलीपकुमार देशमुख उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांनी जी. एस. लॅब या कंपनीचे आभार मानले. शाळेच्या शिक्षिका स्नेहलता वाडेकर, सायली माने होत्या. यासाठी शाळेतील शिक्षिका दीपिका सावंत, शैला बर्वे, अरुणा धिवार, अपर्णा कुमठेकर, सुवर्णा जाधव, सविता अमौलिक, भाग्यश्री भोईर, प्रणाली खंडागळे, शिक्षक विलास गुंजाळ, प्रदीप बोरसे यांचे सहकार्य मिळाले. कंपनीतर्फे मिलिंद बापट, ज्योती परदेशी, शरद कुमार, समीर पटेल यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना शिक्षणास मदत होईल म्हणून पुढाकार घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.