गेल्या चार महिन्यांत 
५०० कोटींचा करभरणा

गेल्या चार महिन्यांत ५०० कोटींचा करभरणा

पिंपरी, ता. ३१ ः शहरातील सहा लाख दोन हजारांपैकी तीन लाख २९ हजार ४७० मिळकतधारकांनी गेल्या चार महिन्यांत पाचशे कोटी रुपयांचा करभरणा केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुलैअखेरपर्यंतची करवसुली तब्बल २१० कोटींनी जास्त झाली आहे. गेल्या पाच वर्षापासून मिळकतकर न भरलेल्यांना जप्ती नोटीस देणे, जप्ती कारवाई करणे, टेलिकॉलिंग व एसएमएस करणे, सिद्धी प्रकल्पातून शंभर टक्के बिलांचे वाटप महापालिकेच्या करसंकलन विभागाने केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. जुलै अखेरपर्यंत दोन हजार ४३४ औद्योगिक, दोन लाख ९१ हजार ९२ निवासी, २६ हजार २८९ बिगरनिवासी, सात हजार ६२५ मिश्र, दोन हजार ३२६ मोकळ्या जमीन आणि तीन इतर मिळकतधारकांनी करभरणा केला आहे. सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, ‘‘मिळकतकर वसुली करण्यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन प्रयोग करीत आहोत. नागरिकांनी कर भरण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे.’’
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com