राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची
शहर कार्यकारिणी बरखास्त

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त

पिंपरी, ता. ३१ : शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून, या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरद पवार गट) विद्यमान शहर कार्यकारिणी आम्ही बरखास्त करीत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या या पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रांताध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘राष्ट्रवादी युवक’ची नवीन कार्यकारिणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या देण्यात येतील, अशी माहिती शेख यांनी दिली.

‘‘राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरातील सर्व कार्याध्यक्ष, सर्व विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, संघटक, चिटणीस व शहर कार्यकारिणी सदस्य, सर्व प्रभाग अध्यक्ष व वॉर्ड अध्यक्ष आदी सर्व पदाधिकारी पदमुक्त करण्यात येत आहेत.’’
- इम्रान शेख, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com