

पिंपरी, ता. १८ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त ‘माझी माती माझा देश’ अभियान महापालिकेने राबविले. त्याअंतर्गत शहीद जवानांच्या सन्मानार्थ शिलाफलकांची उभारणी करून त्यांना अभिवादन केले.
महापालिका अग्निशमन विभागातील शहीद जवान विशाल जाधव यांच्या नावाचा शिलाफलक संत तुकारामनगर येथे उभारला. त्याचे अनावरण प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता रामदास तांबे, उपआयुक्त रविकिरण घोडके, उपअभियंता जयकुमार गुजर, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
एक डिसेंबर २०१९ रोजी जाधव कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी अशोक कामटे, १९६२ च्या भारत-चीन युद्धात जयसिंग शिंगटे, १९७१ च्या भारत-पाक युद्धात तुळशीराम साळुंखे, १९८७ च्या ऑपरेशन पवनमध्ये नागोजी गोरे, १९९७ मध्ये सुभेदार जालिंदर पाटील व १९९८ मध्ये मेजर प्रकाश पाटील, २००४ च्या ऑपरेशन रक्षकमध्ये नाईक दत्तात्रेय भोसले, २०१६ मध्ये पोर्ट ब्लेअर येथील विमान अपघातात फ्लाइंग लेफ्टनंट कुणाल बारपट्टे शहीद झाले. त्यांच्या नावाचा शिलाफलक मोरवाडी आयटीआयच्या आवारात उभारला आहे. त्याचेही अनावरणही सिंह यांच्या हस्ते झाले. केंद्राचे प्राचार्य शशिकांत पाटील उपस्थित होते.
---
फोटो ः 62133
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.