Pawna Dam
Pawna DamSakal

Dam Water Discharge : पवना, इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा

पवना, कासारसाई, आंद्रा, वडिवळे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व खालील बाजूस गुरुवारी मध्यरात्रीपासून कधी जोरदार, तर कधी संततधार पाऊस सुरू आहे.

पिंपरी - पवना, कासारसाई, आंद्रा, वडिवळे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व खालील बाजूस गुरुवारी मध्यरात्रीपासून कधी जोरदार, तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. पवना आणि कासारसाई धरणातून पवना नदीत आणि आंद्रा व वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू केला आहे.

शुक्रवारी दुपारी चारला त्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शिवाय, मुळशी धरणही भरले असून, त्यातूनही विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नदी काठच्या रहिवाशांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्या शहरातून वाहतात. पवना व मुळा नदीचा जुनी सांगवी, दापोडी येथे संगम आहे. पवना नदीवर पवना धरण आणि मुळा नदीवर मुळशी धरण आहे. कासारसाई नदी गहुंजे गावाजवळ पवना नदीला मिळते. त्यावरील कासारसाई धरणातूनही विसर्ग सुरू केला आहे.

वडिवळे व आंद्रा धरणातून सोडलेले पाणी कामशेत परिसरात इंद्रायणी नदीला मिळते. त्यामुळे शहर परिसरातील तीनही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाची भर पडली आहे. त्यामुळे नदीतील पाणी पातळी आणखी वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी महापालिकेने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

आंद्रा धरणातून अनियंत्रित विसर्ग

आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. धरण ‘द्वारविरहित’ आहे. त्यामुळे पाऊस व धरणातील पाण्याचा येवा वाढत गेल्यास धरणाच्या सांडव्यावरून आंद्रा नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग चालू होऊ शकतो, असे खडकवासला कालवा विभागाने कळविले आहे.

हेल्पलाइन

मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष / ०२०-२८३३११११, ६७३३११११

मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी / ०२०-२७४२३३३३, २७४२२४०५, ९९२२५०१४७५

उपअग्निशमन केंद्र भोसरी / ८६६९६९२१०१, ९९२२५०१४७६

उपअग्निशमन केंद्र प्राधिकरण / ०२०-२७६५२०६६, ९९२२५०१४७७

उपअग्निशमन केंद्र रहाटणी / ८६६९६९३१०१, ९९२२५०१४७८

उपअग्निशमन केंद्र तळवडे / ०२०-२७६९०१०१, ९५५२५२३१०१

उपअग्निशमन केंद्र चिखली / ०२०-२७४९४८४९, ८६६९६९४१०१

दृष्टिक्षेपात धरणांतील विसर्ग

धरण / विसर्ग

पवना / ५६००

वडिवळे / ३९९२

आंद्रा / अनियंत्रित

नागरिकांना सूचना

- नदीपात्रात उतरू नये

- नदीमधील पाण्याचे पंप काढून घ्यावेत

- नदीकाठचे शेती अवजारे, जनावरे हटवावीत

- सर्वांनी योग्य दक्षता घ्यावी

पवना, आंद्रा, वडिवळे धरण क्षेत्र आणि धरणाच्या पुढील भागात पाऊस सुरू आहे. धरणाच्या वीजनिर्मिती गृहाद्वारे आणि सांडव्यावरून पाच हजार ६०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना व इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होऊ शकते. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये.

- शेखर सिंह, प्रशासक, महापालिका

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रस्त्यावरील वीजवाहिन्या, खांब, डीपी व फीडर बॉक्स यांच्या संपर्कात येऊ नये. जनावरे सोडू नये किंवा बांधू नये. औद्योगिक क्षेत्रात उघड्यावर रासायनिक पदार्थांचा साठा करू नये. अशा ठिकाणी पाण्याचा संपर्क आल्यास दुर्घटना संभवू शकते. नागरिकांनी जपून राहावे.

- चंद्रकांत इंदलकर, सहआयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com