Fri, Sept 29, 2023

बॉक्सिंग संघटनेच्या
अध्यक्षपदी खेडेकर
बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी खेडेकर
Published on : 27 May 2023, 11:16 am
पिंपरी, ता. २७ ः महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन संलग्न पिंपरी-चिंचवड शहर बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी रघुनाथ खेडेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष प्रकाश काकडे, उपाध्यक्ष मनोहर इंगवले, प्रमोद भोसले, मधुकर काळे; खजिनदार नागनाथ पारसी, सहसचिव राजकुमार तांबे यांच्यासह डॉ. राहुल पाटील, ऋषिकांत वचकल, राम रजक, अमित गमरे, विलास कुटे, तांत्रिक सल्लागार कॅप्टन गोपाल देवांग आदींचा समावेश आहे.