
पिंपरी सकाळ एज्यु एक्स्पो
सकाळ एज्यु एक्स्पो ः लोगो
करिअर मार्गदर्शनासाठी १७ जूनपर्यंत थांबा
चिंचवडमध्ये १७ आणि १८ जून रोजी ‘सकाळ एज्यु एक्स्पो
पिंपरी, ता. २७ ः बारावीचा निकाल लागला आहे. बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी घेतलेल्या ‘सीईटी’चा निकाल १३ जूनला लागणार आहे. शिवाय, काही दिवसांत दहावीचा निकालही लागणार आहे. त्यामुळे आता पुढे काय? असे प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहेत. त्यांचे उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण, करिअरबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळावे, एकाच छताखाली सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांची माहिती व्हावी. यासाठी ‘सकाळ एज्यु एक्स्पो २०२३’चे आयोजन १७ व १८ जून रोजी चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये केले आहे.
दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यासह पालकांच्या मनात चिंता आहे. मार्क्स किती मिळतील. टक्के किती असतील. त्यानंतर कोणत्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं? करिअर कशात करायचं? काहींनी ठरवलेलंही असेल. ‘यात’ नाहीत तर, ‘त्यात’ असे पर्यायही मनात असतात. ‘निकाल लागल्यावर बघू’, असंही काहींचं म्हणणं असतं. काहींना करिअर बाबत कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं?, असाही प्रश्न पडलेला असतो. या सर्व किंतु, परंतुवर लवकरच एक सोल्युशन येत आहे आणि ते घेऊन येत आहे, तुमचा, आमचा, आपला ‘सकाळ.’ होय! अगदी खरंय, दहावी, बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ‘सकाळ’ मार्गदर्शन घेऊन येत आहे. त्यामुळे चिंता सोडा आणि तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शनाची संधी मिळवा, तीही अगदी अमूल्य!
काय? कधी? केव्हा? कुठे?
काय? ः सकाळ एज्यु एक्स्पो
कधी? ः १७ व १८ जून २०२३
केव्हा? ः सकाळी १० ते रात्री ८
कुठे? ः ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड
काय सांगता?
- आता घेता येईल करिअरचा योग्य निर्णय
- दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा
- शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच छताखाली
- विविध क्षेत्रातील करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
नाव नोंदणीसाठी
संपर्क ः ८३७८९८७८३६
लिंक ः https://forms.gle/GqHqaNiy5HbUi3uG7