Thur, Sept 21, 2023

अहिल्यादेवींच्या पुतळ्यास
पिंपरी येथे अभिवादन
अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पिंपरी येथे अभिवादन
Published on : 1 June 2023, 9:33 am
पिंपरी, ता. १ ः पिंपरी येथील भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर समितीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुणे जिल्हाध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौतम गायकवाड, भीमशक्ती विद्यार्थी आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष परमेश्वर निसरगंध, भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड संघटक विशाल केंगार, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष शुभम कांबळे, पिंपरी चिंचवड शहर सचिव सिद्धू कांबळे पिंपरी विधानसभा अध्यक्ष अजय शेरखाने, बसवराज मगी, लहू साळुंखे, अमोल शिंगारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.