भोसरीत रंगला ‘उद्योजक संवाद’
औद्योगिक क्षेत्राच्या समस्या आणि उपाययोजनांवर चर्चासत्र

भोसरीत रंगला ‘उद्योजक संवाद’ औद्योगिक क्षेत्राच्या समस्या आणि उपाययोजनांवर चर्चासत्र

Published on

पिंपरी, ता. १६ : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँन्ड ॲग्रीकल्चरलच्या (एमसीससीआयए) माध्यमातून भोसरी येथे पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्राच्या समस्या आणि उपाययोजना याबाबत उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांचा ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम नुकताच झाला.
भोसरी येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘एमसीसीआयए’च्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकप्रतिनिधींच्या सहभागाने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी, महावितरणचे अधिकारी, लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अभय भोर, सुरेश म्हेत्रे, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर, मुख्य संचालक प्रशांत गिरबने, संचालक सुधानवा कोपर्डेकर यांच्यासह विविध कंपन्यांची प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासात पहिल्यांदा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरात तीनदा बैठक घेतली. उद्योजकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. शास्तीकरासारखा जटिल मुद्दा मार्गी लावण्यात यश मिळाले. तसेच, लघु उद्योजक संघटनेच्या कार्यालयासाठी जागेचा प्रश्नही मार्गी लागला असून, आगामी काळात उद्योजकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे.’’
उद्योगांशी संबंधित विविध समस्या व मुद्यांवर या संवाद कार्यक्रमात सकारात्मक चर्चा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या सोडवण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली.

फोटो ः 49326

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com