शालेय वाहनांची तपासणी कागदावरच आरटीओ उदासीन ः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड शहरातील शाळा गुरुवारपासून सुरु झाल्या. मात्र विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या शालेय वाहनांच्या तपासणीबाबत वाहतूक विभाग उदासीन आहे. गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाच्यावतीने शालेय वाहनांच्या तपासणी मोहिमेबाबत परिपत्रक काढण्यात आले. मात्र किती वाहनांची तपासणी करून, योग्यता प्रमाणपत्र घेतले आहे. याबाबत वाहतूक विभागाकडे कोणतीही माहिती नाही. यामुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यार्थी वाहतूक करणारी वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने काय यंत्रणा असावी, त्यांनी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे, याबाबतचे नियम या परिपत्रकामध्ये दिले आहेत. पण वाहनांची तपासणी पूर्ण करण्यासाठी कोणतीही डेडलाईन या पत्रकामध्ये दिलेली नाही.
पिंपरी -चिंचवड शहरात तीन हजारांहून अधिक नोंदणीकृत शालेय वाहने आहेत. शासन नियमांनुसार योग्यता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्व वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. ही तपासणी स्कूलबसचा रंग, अंर्तगत रचना, आसनक्षमता, वेगनियंत्रक यंत्रणा या सर्व निकषांवर केली जाते. हे सर्व निकष पाळले जात असतील तरच वाहनाला योग्यता प्रमाणपत्र म्हणजेच फीट सर्टिफिकेट मिळते. त्यानंतरच संबंधित बस शालेय वाहतुकीसाठी सुरक्षित मानली जाते. शहरात धावणाऱ्या किती स्कूलबसकडे ही तपासणी केलेले योग्यता प्रमाणपत्र आहे, याची कोणतीही आकडेवारी आरटीओकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या बस विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहेत का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
नियमावलीची पूर्तता न करणाऱ्या स्कूल बसवर वायुपथकाद्वारे कारवाई केली जाईल. असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. पण अनफिट बस दुर्घटनाग्रस्त झाल्यास याला जबाबदार कोण हा ही प्रश्न निर्माण झाला आहे.
‘‘शाळा सुरु होण्याआधी आठ दिवस शालेय वाहनांची तपासणी करण्यासाठी बस चालकांना सूचना देण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नसलेली स्कूलबस आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
-
अशी आहे नियमावली
वाहनचालकांकडे शालेय वाहतुकीचा परवाना आवश्यक
वाहनांची तपासणी केलेले योग्यता प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक
प्रत्येक बसमध्ये परिचारक असणे गरजेचे
वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर बसविण्यात यावेत
वैध विमा प्रमाणपत्र असणे आवश्यक
वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक
बसमध्ये प्रथमोपाचाराचे साहित्य असावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

