जनतेसाठी काम करताना ‘इगो’ बाळगू नका

शासन आपल्या दारी ः मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे टोचले कान

जनतेसाठी काम करताना ‘इगो’ बाळगू नका शासन आपल्या दारी ः मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे टोचले कान

Published on

पिंपरी, ता. १६ ः ‘‘सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान एक एप्रिलपासून सुरू केले आहे. त्याद्वारे सरकारी योजना नागरिकांमध्ये पोहोचविण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं पाहिजे. लोकप्रतिनिधी व प्रशासन हे विकासाच्या गाडीची दोन चाके आहेत. त्यामुळे कोणीही इगो बाळगू नका. जनतेसाठी काम करत राहा.’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे कान टोचले.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सरकारी व महापालिकेच्या विविध योजना व सेवांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. थेरगाव येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, महापालिका प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी निर्णय
सन २०१८ ते २०२३ पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्क १०० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०२३ पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणी होणार आहे. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामासाठीचा ४६० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ केला आहे. नवनगर विकास प्राधिकरणाच्या भूसंपादनामुळे बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

विविध दाखल्यांसाठी स्टॉल
उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांसाठी जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, ३३ टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्वाचा दाखला, आधार कार्डमधील दुरुस्ती व अद्ययावत करणे, मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, रेशनकार्डवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा दाखला.

महापालिका स्तरावरील योजना
- मतिमंद, आत्ममग्न, मेंदूचा पक्षाघात झालेल्या व्यक्ती, बहुविकलांग व्यक्तींकरिता निरामय आरोग्य विमा योजनेअंतर्गत लाभार्थींचा ५०० रुपये वार्षिक विमा हफ्ता दरवर्षी महापालिका भरणार
- दिव्यांग नागरिकांना विम्यामुळे वार्षिक एक लाख रुपये रकमेपर्यंत वैद्यकीय उपचार
- ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत घरकूल योजनेतील सहा इमारतींमधील २५२ सदनिकांचे वाटप
- कोरोना काळात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कोरोना विषाणू विमा कवच योजनेच्या प्रत्येकी २५ लाख रुपयांचा धनादेश
- विद्यार्थ्यांना बारावीनंतरचे वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी परीक्षा, यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रथम वर्षासाठी एक लाख रुपये अर्थसाहाय्य
- दिव्यांगत्वानुसार उपयुक्त साधने घेण्यासाठी लाभार्थींच्या गरजा आणि दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार एक लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य
- व्यवसायासाठी दिव्यांगांना बँकेकडील मंजूर कर्जाच्या ५० टक्के अथवा एक लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
- तृतीयपंथी व्यक्तीला महापालिका सेवेत कायम स्वरूपात नियुक्ती पत्र
- रामभाऊ म्हाळगी अर्थसहाय्य ः मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी साडेसात हजार रुपये
- प्रमोद महाजन अर्थसाहाय्य ः परदेशातील उच्चशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतींना प्रथम वर्षासाठी दीड लाख रुपये

- बेटी बचाव, बेटी पढाओ उपक्रम ः पहिली मुलगी किंवा पहिली मुलगी असताना दुसऱ्या मुलीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी १० हजार रुपये
- बचट गट प्रोत्साहन ः सहा महिने पूर्ण झालेल्या महिला बचत गटांना १५ हजार रुपये
- ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या रकमेचे धनादेश वाटप
- जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबवलेल्या घरकूल योजनेतील सहा इमारतींमधील २५२ सदनिकांचे वाटप
- निगडीत सुमारे तीन हजार १५० चौरस मीटर क्षेत्रात उभारलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचे अनावरण
----
फोटो ः 49832

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com