जलतरण प्रशिक्षणाच्या
प्रमाणपत्रांचे वितरण

जलतरण प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रांचे वितरण

Published on

पिंपरी, ता. १८ ः पिंपळे गुरवमधील काळूराम जगताप जलतरण तलाव येथे घेण्यात आलेल्या उन्हाळी जलतरण प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच पार पडला. भारताचे पहिले पॅरा ऑलिंपिक विजेते मुरलीकांत पेठकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीडशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह वितरण करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेने जलतरण तलाव उपलब्ध केल्यामुळे प्रशिक्षकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यातूनच भविष्यातील चांगले जलतरणपटू व जीव रक्षक तयार होऊ शकतील, असे पेठकर यांनी सांगितले.
राधिका घोडके यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा शिक्षक रवींद्र कांबळे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.