‘दिवंगत साने यांचा आशीर्वाद 
अजित गव्‍हाणे यांच्‍या पाठीशी’

‘दिवंगत साने यांचा आशीर्वाद अजित गव्‍हाणे यांच्‍या पाठीशी’

Published on

पिंपरी, ता. १७ ः ‘‘महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिवंगत दत्ता साने यांनी चिखली, मोशी परिसरात विकासकामांचा डोंगर उभा केला. त्‍या कामाच्‍या माध्यमातून सर्वसामान्‍य जनतेशी नाळ जोडली. त्‍यामुळे जनतेचा मोठा समूह त्‍यांच्‍याशी जोडलेला आहे. त्‍यामुळे साने यांचा आशीर्वाद अजित गव्‍हाणे यांच्‍या पाठीशी असेल,’’ अशी भावना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष यश साने यांनी व्यक्त केली.
यश साने यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, महाविकास आघाडीने भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघांमध्ये मोशी, चिखली, साने वस्ती, मोरे वस्ती या भागांचा समावेश आहे. या गावांत दिवंगत दत्ता साने यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्‍यांच्‍या विचारांचा वारसा घेऊन कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गव्हाणे यांनाही साने यांचा आशीर्वाद मिळत आहे. स्वयंस्फूर्तीने युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. चिखली, मोशी प्रभाग साने यांचा गड मानला जातो. येथील नागरिक दिवंगत दत्ता साने यांचे काम विसरलेले नाही. त्यांनी आपल्या कामातून विकास कामांचा डोंगर उभा केला आहे.

फोटोः 63142

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com