भोसरी मतदारसंघातील १७ मतदान केंद्रांत बदल

भोसरी मतदारसंघातील १७ मतदान केंद्रांत बदल

Published on

पिंपरी, ता. १७ ः भोसरी विधानसभा मतदारसंघातील १७ मतदान केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल केला आहे. त्यात बोऱ्हाडेवाडी मोशीतील चार, चिखलीतील तीन, वडमुखवाडी चऱ्होली पाच आणि दिघीतील पाच या मतदान केंद्रांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली.
मतदारांच्या सोयीसाठी जुन्या केंद्रांच्या ठिकाणी बदललेल्या ठिकाणांबाबत दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. त्या-त्या परिसरातील मतदारांना मतदान केंद्राचे ठिकाण बदलल्याबाबत लेखी स्वरुपात कळविले आहे. स्वीप टीमद्वारे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मतदारांनी बदललेल्या मतदान केंद्रांनुसार योग्य ठिकाणी जाऊन मतदान करावे, असे आवाहनही लबडे यांनी केले आहे.

गावनिहाय बदललेली मतदान केंद्रे
आधीचा केंद्र क्रमांक व ठिकाण (कंसात बदललेला केंद्र क्रमांक व ठिकाण)

मोशी बोऱ्हाडेवाडी
१४६ अ ः सस्ते कन्या शाळा क्रमांक १३ (१५६ ः व्हॉयेज हाउसिंग सोसायटी क्लब हाऊस, मोशी बोऱ्हाडेवाडी)
१५४ ः सस्ते कन्या शाळा क्रमांक १३ (१६२ ः केंद्रीय विहार सोसायटी क्लब हाऊस कापडी पार्टीशन, संतनगर)
१५६ ः सस्ते कन्या शाळा क्रमांक १३ (१६४ ः केंद्रीय विहार सोसायटी क्लब हाऊस कापडी पार्टीशन, संतनगर)
१५८ ः रस्ते कन्या शाळा क्रमांक १३ (१६६ ः केंद्रीय विहार सोसायटी क्लब हाऊस कापडी पार्टीशन, संतनगर)

चिखली
१६६ ः राजर्षी शाहू महाराज विद्यालय, शरदनगर खोली क्रमांक ९ (१७५ ः मधुर मिलन सोसायटी घरकुल, इमारत क्रमांक ए-३४)
१७२ ः राजर्षी शाहू महाराज विद्यालय, शरदनगर खोली क्रमांक ५ (१८१ ः मधुर मिलन सोसायटी घरकूल, इमारत क्रमांक ए-३४)
१७४ ः राजर्षी शाहू महाराज विद्यालय, शरदनगर खोली क्रमांक ७ (१८३ ः मधुर मिलन सोसायटी घरकुल, इमारत क्रमांक ए-३४)

वडमुखवाडी
२५८ ः महापालिका शाळा क्रमांक २३, सभागृह अ (२६९ ः प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था, वडमुखवाडी, पत्राशेड)
२५९ ः महापालिका शाळा क्रमांक २३, सभागृह ब (२७० ः प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था, वडमुखवाडी, पत्राशेड)
२६० ः महापालिका शाळा क्रमांक २३, पत्राशेड (२७१ ः प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था, वडमुखवाडी, पत्राशेड)
२६१ ः महापालिका शाळा क्रमांक २३, खोली क्रमांक ३ (२७२ ः प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था, वडमुखवाडी, पत्राशेड)
२६२ ः महापालिका शाळा क्रमांक २३, खोली क्रमांक ४ (२७३ ः प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था, वडमुखवाडी, पत्राशेड)

दिघी
३४३ ः मंजुरीबाई विद्यालय, आदर्शनगर दिघी खोली क्रमांक ६ (३५८ ः लक्षदीप इंटरनॅशनल स्कूल दिघी, पार्किंग पत्राशेड)
३४४ ः मंजुरीबाई विद्यालय आदर्शनगर, दिघी खोली क्रमांक ७ (३५९ ः लक्षदीप इंटरनॅशनल स्कूल दिघी, पार्किंग पत्राशेड)
३४५ ः मंजुरीबाई विद्यालय, आदर्शनगर दिघी खोली क्रमांक ८ (३६० ः लक्षदीप इंटरनॅशनल स्कूल दिघी, पार्किंग पत्राशेड)
३४६ ः मंजुरीबाई विद्यालय, आदर्शनगर दिघी खोली क्रमांक ९ (३६१ ः लक्षदीप इंटरनॅशनल स्कूल दिघी, पार्किंग पत्राशेड)
३४७ ः मंजुरीबाई विद्यालय, आदर्शनगर दिघी खोली क्रमांक १० (३६२ ः लक्षदीप इंटरनॅशनल स्कूल दिघी, पार्किंग पत्राशेड)

मतदारांनी मतदार यादीत नाव शोधण्यासाठी electoralsearch.eci.gov.in या लिंकचा वापर करावा अथवा आपल्या केंद्रावरील केंद्र स्तरीय अधिकाऱ्याशी (बीएलओ) संपर्क साधावा. प्ले स्टोअरवरून व्होटर हेल्पलाइन डाऊनलोड करून त्यावरही मतदारांना नाव शोधता येईल.
- रेवणनाथ लबडे, निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी, विधानसभा मतदारसंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com