मावळच्या विकासासाठी 
भेगडे यांच्या पाठीशी ः नेवाळे

मावळच्या विकासासाठी भेगडे यांच्या पाठीशी ः नेवाळे

Published on

कामशेत, ता. १७ ः राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, सूडबुद्धीने वागू नका. अन्यथा एक दिवस रसातळाला जाल, असा इशारा देत अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन पुणे जिल्हा दूध संघाचे (कात्रज) माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केले.
कामशेत येथील छत्रपती शिवाजी चौकात बाळासाहेब नेवाळे यांनी ‘लढा दडपशाही विरुद्ध’ सभेचे आयोजन केले होते. माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, काँग्रेसचे नेते रामदास काकडे, माऊली शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ आदी उपस्थित होते. नेवाळे म्हणाले, भूलथापांना बळी पडू नका.’’
गुजरात हे आघाडीवर चाललेले राज्य आहे. वर्गिस कुरियन यांच्यामुळे दूध क्रांती झाली. त्यामुळे शेतकरी सुखी व समाधानी झाला. तेच काम गोकूळ, कात्रज दूध संघाने केले आहे, असे काकडे यांनी सांगितले. बाफना म्हणाले, ‘‘सहकार जगला तर राज्य जगेल.’’ तालुक्यातील कारभार पसंत नाही म्हणून आम्ही एक झालो आहोत. निवडणूक संपली की राजकारण संपले पाहिजे, असे मत गणेश भेगडे यांनी व्यक्त केले.’’

फोटोः 63379

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com