आता दृष्टिहीन फुटबॉल खेळाडूही धावणार !
पिंपरी, ता.१७ ः पिंपरी-चिंचवडमध्ये ‘यशदा पीसीएमएच’ चौथी अर्धमॅरेथॉन शर्यत यंदा १५ डिसेंबरला होणार आहे. अर्धमॅरेथॉन म्हणजे २१ किमी, १० किमी आणि ५ किमी गटांत ही शर्यत होणार आहे. या शर्यतीत यंदा दृष्टिहीन महिला फुटबॉल संघातील खेळाडू देखील धावणार आहेत.
‘यशदा पीसीएमएच’कडून सामाजिक उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी माई बाल भवन समवेत जोडले आहे. माई बाल भवन हे शर्यतीचे चॅरिटी पार्टनर राहणार आहे. भारतीय दृष्टिहीन महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार कोमल गायकवाड, दीपाली कांबळे, दीपाली पवार, स्वाती माने, प्राची गुप्ता, सारिका पाटील, सोनाली रोड, मयुरी जोशी, सुवर्ण डावरे, श्रेया मोहिते, भारती वेखंदे या खेळाडू शर्यतीत भाग घेणार आहेत. या खेळाडूंची उपस्थिती स्पर्धेसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
भारतीय संघाची माजी कर्णधार कोमल गायकवाड म्हणाली, ‘‘मी इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी गेले होते आणि जपानमध्येही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. पुन्हा कर्णधार म्हणून खेळायचे आहे आणि देशाचे नाव उंचवायचे आहे.
माजी कर्णधार दीपाली कांबळे म्हणाली,‘‘मी इंग्लंड येथे महिला विश्वचषकात भारतीय संघाची कर्णधार म्हणून खेळले आहे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होणे हा नेहमीच अभिमानाचा क्षण असतो.’’
संघाची सदस्या भाग्यश्री रोगी म्हणाली,‘‘मी जपानविरुद्ध भारतीय संघाकडून खेळले आहे. आता पुन्हा मध्यरक्षक म्हणून भारतीय संघात खेळण्याची इच्छा आहे. दृष्टिहीनांच्या फुटबॉलमध्ये देशाचे नाव मोठे करायचे आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

