भोसरीच्या विकासाचे ध्येय ः गव्हाणे

भोसरीच्या विकासाचे ध्येय ः गव्हाणे
Published on

भोसरी, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या रविवारी महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. गेली २० वर्ष नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष होते. नियमांना धरून काम केले. आगामी काळातही याच धारणेनुसार काम करणार असल्याचा विश्वास अजित गव्हाणे यांनी दिला.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ रविवारी मतदार संघातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. विविध सोसायटी, समाज मेळावे यांना उपस्थित राहून गव्हाणे यांनी मतदारांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सोमवारी संपणार असून, प्रचाराच्या शेवटच्या रविवारी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला. मोशी दिघीमध्ये २० हून अधिक सोसायट्यांमध्ये संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘गेली वीस वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिचे सोने केले. भोसरीतील उड्डाणपूल, अंकुशराव लांडगे सभागृह, विविध रस्ते, पाण्याच्या टाक्या, ग्रेड सेपरेटर असे अनेक प्रकल्प केवळ भोसरी मतदारसंघासाठी नाही तर संपूर्ण शहरासाठी पूर्णत्वाला नेले. सध्याचे शहरातील विविध रस्ते हे तत्कालीन आयुक्त दिलीप बंड आणि मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना मंजूर केलेले आहेत. हे या ठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते. भोसरी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.’’ गव्हाणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिघी येथे त्यांना आदरांजली अर्पण केली. शिवसेनेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जाज्वल स्वाभिमान भिनलेला असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी दिघी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेतले. संताजी सेवा प्रतिष्ठानचा अंकुशराव लांडगे सभागृहात वधू-वर मेळावा होता. तेथील आयोजकांना आगामी काळात समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. मराठवाडा कौटुंबिक स्नेह मेळाव्यात गव्हाणे यांनी संवाद साधत मराठवाडा समाजाचे कौतुक केले.

फोटो ः 63474

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com