राष्ट्रीय पॅरा नेमबाजीमध्ये रवी ओझाला एकेक सुवर्ण, रौप्य

राष्ट्रीय पॅरा नेमबाजीमध्ये रवी ओझाला एकेक सुवर्ण, रौप्य

Published on

पिंपरी, ता. १७ ः बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित पाचव्या राष्ट्रीय पॅरा नेमबाजी (रायफल शूटिंग) अजिंक्यपद स्पर्धेत राजस्थानकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना रवी ओझा याने प्रत्येकी एकेक सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीबरोबरच भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठीही तो पात्र ठरला आहे.
स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये ६०९ तर ५० मीटरमध्ये ५८४ गुण मिळवत त्याने चार अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. पुण्यात राहून अंजली भागवत शूटिंग ॲकेडमीमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, प्रशिक्षक रश्मी त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली रवीचा सराव सुरू आहे.
प्रशिक्षक रश्मी त्रिवेदी म्हणाल्या, ‘‘आर्थिक स्थिती नाजूक असल्याने रायफल नसतानाही नाउमेद न होता रवी सातत्याने सराव करत आहे. रवीच्या कामगिरीने आनंद वाटत असून येत्या काळात त्याच्याकडून आणखी चांगली कामगिरी झाल्याचे पाहावयास मिळेल.’’
PNE24U63484

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com