महापालिकेतर्फे २७ ठिकाणी पार्किंग सुविधा

महापालिकेतर्फे २७ ठिकाणी पार्किंग सुविधा

Published on

पिंपरी, ता. १९ ः चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील २७ ठिकाणी आठपेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत. अशा ठिकाणी महापालिका आणि वाहतूक पोलिस यांच्या सहकार्याने मतदारांच्या सोयीसाठी वाहनतळांची (पार्किंग) व्यवस्था केली आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी मतदारांनी वाहने उभी करावीत, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. महापालिका हद्दीतील मतदार संघामध्ये मतदान केंद्रांच्या १०० मीटर अंतराबाहेर पार्किंगची व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी इमारत केंद्रांपासून २०० मीटर अंतराबाहेर वाहनतळांची व्यवस्था केली आहे.

सर्वाधिक मतदान केंद्रांची ठिकाणे
केंद्र ठिकाण / पत्ता / केंद्र क्रमांक / पार्किंग ठिकाण
जीके गुरुकुल / पिंपळे सौदागर / ३४५ ते ३५१, ३६१ ते ३६४, ३६६ ते ३७१ / गोविंद गार्डन ब्रिजच्या बाजूस व विबग्योर चौकासमोरील रस्ता
महापालिका शाळा ५४-१ / पिंपळे गुरव / ३९६ ते ४०९ / पेट्रोलपंप समोरील रस्ता
महापालिका शाळा / वाकड / ४३७ ते ४५१ / संजय कळते कंपनीची मोकळी जागा, गावठाण रस्ता
विज्डम हायस्कूल / विकासनगर किवळे / ६ ते १६ / मतदान केंद्रापासून २०० मीटर लांब रस्त्याच्या कडेला
बाबूरावजी घोलप विद्यालय / सांगवी / ४९८ ते ५०८, ५१९ ते ५२१ / शनिमंदिर मैदान
यशवंतराव चव्हाण शाळा ६०-१ / थेरगाव / २१८ ते २२९ / बाबूजीबुवा उद्यानासमोर आणि रस्त्याच्या बाजूला
महापालिका शाळा ५४-२ / पिंपळे गुरव / ४१० ते ४१९ / मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला
विद्याविनय निकेतन चौंधे शाळा / विशालनगर / ४६८ ते ४७८ / मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला
बीटी मेमोरिअल स्कूल / काळेवाडी / १८७ ते १९६ / लकी बेकरीसमोर रस्त्याच्या कडेला
गुरुमय्या प्रायमरी स्कूल / चिंचवडेनगर / ७६ ते २५ / मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतराबाहेर रस्त्यालगत
श्री. फत्तेचंद जैन हायस्कूल / चिंचवड / १२५ ते १३२, १४४ ते १४५ / मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतराबाहेर रस्त्यालगत
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय / निगडी प्राधिकरण / --- / राजनंदा बंगल्यासमोरील रस्ता
सेंट उर्सुला हायस्कूल / निगडी / --- / एनआयबीआर कॉलेज समोरील रस्ता
गणेश इंग्लिश स्कूल / दापोडी / --- / पिंपळे गुरव रस्त्यालगत व काटे वृंदावन सोसायटी समोरील मोकळी जागा
हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर / दापोडी / --- / रेल्वे फाटक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्त्यालगत
नागेश्वर हायस्कूल / गणेशनगर मोशी / --- / नाशिक महामार्गालगत सस्ते वस्ती खासगी जागा व भारतमाता चौक ते आळंदी रस्त्यालगत
महापालिका शाळा / मोशी गावठाण / --- / आळंदी रस्त्यालगत नागेश्वर मंदिर देवस्थान खासगी मोकळी जागा
महापालिका शाळा क्रमांक ८७ / जाधववाडी / --- / साई जीवन प्रायमरी स्कूलमागील मैदान
महापालिका सस्ते शाळा / बोराडेवाडी / --- / शिवशंभो कॉलनी कस्तुरी सोसायटीसमोरील रस्ता, बोऱ्हाडेवाडी चौक ते कृषी प्रदर्शन रस्त्यालगत
गणगे प्रशाला / कृष्णानगर / --- / मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर ओमसाई बंगल्या समोरील रस्त्यालगत
सेंट अॅन्स स्कूल / त्रिवेणीनगर / --- / सचिन तरुण मित्र मंडळ कृष्णानगर समोरील रस्त्यालगत
महापालिका नेहरू शाळा / चऱ्होली / --- / क्रांती चौक व शाळेच्या परिसरातील रस्त्यालगत
स्टर्लिंग स्कूल / इंद्रायणीनगर / --- / शाळेपासून २०० मीटर बाहेर सद्‍गुरूनगर पीएमपी बस डेपो रस्त्यालगत
स्वामी समर्थ स्कूल / इंद्रायणीनगर / --- / संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल


समता विद्यालय / चक्रपाणी वसाहत / --- / गणराज कॉलनी गल्ली नंबर ५ ते आयुष इंजिनिअरिंग कंपनीच्या जागेत व रस्त्यालगत
बारसे विद्यालय / दिघी रोड भोसरी / --- / शाळेपासून २०० मीटरपुढे दिघी रस्त्यालगत
गायकवाड विद्यालय / दिघी / --- / मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर राघव मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या मैदानात
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com