बालेवाडी संकुल, थेरगाव भागांत शनिवारी वाहतुकीत बदल
पिंपरी, ता. १९ : पिंपरी व भोसरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शनिवारी (ता. २३) म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे; तर चिंचवड मतदार संघाची मतमोजणी थेरगाव येथील पिंपरी-चिंचवड महापालिका कामगार भवन येथे होणार आहे. या मतमोजणी परिसरात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने तेथे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, मतमोजणी शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल शनिवारी (ता. २३) पहाटे पाच ते सायंकाळी सात पर्यंत अथवा मतमोजणी पूर्ण होईपर्यंत असेल.
बालेवाडी क्रीडा संकुल परिसर
- गोदरेज सर्कल, म्हाळुंगे गाव ते राधा चौक, राधा चौक ते म्हाळुंगे गाव ते गोदरेज सर्कल हा रस्ता जड , अवजड वाहनांसाठी बंद
- चांदे नांदे येथून येणारी जड वाहने गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण व हिंजवडी मार्गे जातील.
- बाणेर रस्ता, राष्ट्रीय महामार्गावरुन येणारी जड वाहने राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाक्या मार्गे हिंजवडी व इच्छित स्थळी जातील
- बालेवाडी संकुल मुख्य प्रवेश द्वारासमोरील रस्ता उत्तम स्वीट (पुणेरी स्वीट) चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकी पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असून गोदरेज सर्कल व म्हाळुंगे गावातून येणारी हलकी वाहने उत्तम स्वीट (पुणेरी स्वीट) चौक येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकीपासून पुढे मुख्य रस्त्याने राधा चौक येथून जातील
- राधा चौकातून येणारी हलकी वाहने म्हाळुंगे पोलिस चौकीजवळ डावीकडे वळून पुणेरी स्वीट जवळ डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, गोदरेज सर्कल चौक येथून जातील
थेरगावला कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था
- तापकीर चौक ते तापकीर मळा रस्त्यालगतची मोकळी जागा महायुती उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व वाहनतळासाठी राखीव राहणार
- थेरगाव गावठाण येथे महाविकास आघाडी उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व वाहनतळासाठी जागा राखीव राहणार
- इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी व वाहनतळासाठी महापालिका कामगार भवन समोरील पीएमपी बससाठी असलेले डी-मार्टच्या बाजूचे वाहनतळ राखीव राहील
- बालेवाडी संकुल येथे कार्यकर्त्यांना थांबण्याची व वाहनतळाची व्यवस्था
- महाविकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी राधा हॉटेलच्या मोकळ्या जागेमध्ये व न्याती शोरूम ते पॅरादी हवेली भुयारी मार्ग दरम्यानच्या सेवा रस्त्यावर वाहनतळाची व्यवस्था तसेच म्हाळुंगे पोलिस चौकी ते बालेवाडी संकुल मुख्य प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यावर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था
- ऑर्किड हॉटेल हायवे गेट ते मुळा नदी ब्रिज सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार
- राजवाडा गेट से मुळा नदी ब्रिजपर्यंत सेवा रस्त्यावर महायुती पक्षाचे कार्यकर्त्यांच्या थांबण्याची व्यवस्था
- इतर पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते यांच्यासाठी नामदेवराव मोहोळ माध्यमिक विद्यालय, म्हाळुंगे या शाळेमध्ये वाहनतळाची व्यवस्था
- उत्तम स्वीट चौक ते बालेवाडी संकुल मुख्य प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यावर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

