मतदान साहित्य वाटपाची लगबग

मतदान साहित्य वाटपाची लगबग

Published on

पिंपरी, चिंचवड तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत आहे. त्यासाठी मतदान यंत्र व मतदानविषयक साहित्य अनुक्रमे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शंकर अण्णा गावडे कामगार भवन व मोशी प्राधिकरण येथून आज सकाळी वाटप करण्यात आले. यावेळी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले. याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअरचेदेखील वाटप करण्यात आले. हे सर्व साहित्य केंद्रनिहाय वितरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात आले. त्यापूर्वी सर्वांचे प्रशिक्षण झाले. त्यांच्यासह मतदानासाठीचे साहित्य मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी पीएमपी बस व अन्य वाहनांची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त होता. मतदानाच्या अगोदरच्या दिवशीची टिपलेली लगबग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com