पीएमआरडीएच्या शिल्लक सदनिकांना वाढता प्रतिसाद

पीएमआरडीएच्या शिल्लक सदनिकांना वाढता प्रतिसाद

Published on

पिंपरी, ता. १९ : पीएमआरडीएच्‍या सदनिकांसाठी अनामत रक्‍कम भरणाऱ्यांचा प्रतिसाद वाढला आहे. सध्या साडेतेराशे सदनिकांसाठी चार हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्‍यापैकी, अकराशे जणांनी आपली अनामत रक्‍कम जमा देखील केली आहे. सदनिकांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० नोव्‍हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्‍यामुळे, अनामत भरणाऱ्यांची संख्या वाढेल, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.
पीएमआरडीएच्‍या पेठ क्रमांक १२ येथील ४ हजार ८८३ सदनिका आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील ७९२ सदनिकांचा सर्व सुविधायुक्त असा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांचा भव्य प्रकल्प साकारण्यात आला आहे. मात्र, विक्री न झाल्याने त्यापैकी अनेक सदनिका रिकाम्या होत्या. या १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ८ नोव्हेंबरपर्यंत ३ हजारांपेक्षा अधिक इच्छुकांनी अर्जाची ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. या दिवसापर्यंत केवळ ६०२ जणांनीच अनामत रक्कम भरलेली होती. १२ नोव्‍हेंबरपर्यंत पहिली मुदत होती. गृह प्रकल्पांतर्गत सदनिकांची सोडत यापूर्वी काढण्यात आली आहे. ११ ऑक्टोबर २०२४ पासून नव्‍याने सोडत काढण्यात आली. त्याला नागरिकांचा फारसा प्रतिसाद न मिळाल्‍याने तसेच अधिकाधिक नागरिकांची मुदत वाढीची मागणी पाहून आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अनामत रक्कम भरण्याकडे कल
अनेक नागरिक ऑनलाइन नोंदणी करत होते. मात्र, प्रत्‍यक्षात अनामत रक्‍कम भरण्याकडे पाठ फिरवत होते. परंतु, या महिन्‍यात पीएमआरडीएच्‍या आवाहनानंतर नागरिकांनी अनामत रक्‍कम भरण्यासाठी प्रतिसाद दिला आहे. आ‍तापर्यंत १ हजार ११८ नागरिकांनी अनामत रक्‍कम भरली आहे; तर तीन हजार ९९९ जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आणखीन वाढ होईल, असे सांगितले जात आहे.

सदनिका पाहण्याची सुविधा
पेठ क्रमांक १२, ३० आणि ३२ येथील सदनिका कशा आहेत ?, याबाबत नागरिकांना माहिती नव्‍हती. त्‍यामुळे, अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, या सदनिका पाहण्याची सुविधा पीएमआरडीएने दिली आहे. नागरिक तिथे गेल्‍यानंतर संबंधित ठिकाणी अभियंते सदनिका दाखवतील, अशी माहिती पीएमआरडीएने दिली.

नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. अनामत रक्‍कम देखील १ हजार ११८ लोकांनी भरली आहे. आम्‍ही अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. ३० नोव्‍हेंबरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे.
- हिंमत खराडे, उपायुक्‍त, जमीन व मालमत्ता विभाग, पीएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com