Voter List
Voter Listsakal

Assembly Election 20204 : लोकसभा निवडणुकीतील नाव विधानसभेला गायब

लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी मतदान केले आहेत, अशा काही मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीत वगळल्याचा प्रकार समोर आला आहे.
Published on

पिंपरी - लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी मतदान केले आहेत, अशा काही मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीत वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदार चिठ्ठ्या वाटप करणाऱ्‍या अनेक उमेदवारांच्या बूथ कार्यकर्त्यांकडून नावे वगळली गेल्याची माहिती मिळत आहे. अनेकांचे लोकसभेतील बूथ क्रमांक बदलले आहेत. सध्या बुथस्तरीय अधिकाऱ्यांकडून (बीएलओ) मतदारांच्या घरी घरपोच मतदार चिठ्ठी वाटप करण्यात येत आहे. अशावेळी अनेकांच्या मतदार चिठ्ठ्यांच्या नावांमध्ये चुका आहेत. अनेकांची नाव वगळली असल्याचे दिसून येत आहे.

या आहेत मतदारांच्या तक्रारी...
- लोकसभा असणारी नावे वगळली गेलीत
- लोकसभेतले बूथ क्रमांक बदलले
- मतदार केंद्राचे ठिकाणांमध्ये बदल
- मोठ्या प्रमाणात नावांमध्ये चुका
- मतदार ओळखपत्र क्रमांकातही बदल
- टीओके ६ सिरीजनुसार बनलेल्या नवीन कार्डांची नावे यादीत नाहीत

सतरा क्रमांक अर्ज भरुन करा मतदान
ज्या मतदारांचे जर यादीत नाव नसले. पण त्यांच्याकडे मतदानाचे ओळखपत्र (व्होटींग कार्ड) असेल तर, अशा मतदारांनी १७ क्रमांकाचा अर्ज भरून मतदान करणे शक्‍य आहे. अर्ज निवडणुकीच्या दिवशी भेटेल.

का वगळली जातात नावे?
मतदारयादीतून मयत, बाहेर गावी स्थायिक झालेले, मतदार यादीत पुन्हा-पुन्हा आलेली नावे आणि ज्यांचा काहीच तपास लागत नाही, असे बोगस मतदारांची नावे यादीतून वगळली जातात. मतदारयादीचा कार्यक्रम नियमितपणे सुरू असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदार वगळणे हे प्रशासकीय अपयशच म्हणावे लागेल. बऱ्याच मतदारांची नावे मतदार यादीत चुकलेली आहेत. फोटो, वय, पत्ते देखील चुकले आहेत. तहसील कार्यालयात मतदारांसाठी दुरुस्ती अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मग टक्केवारी कशी वाढणार?
लोकसभा निवडणुकीस वेळेस मतदार यादीत नाव होते. पण आता मतदारयादीत नावच दिसत नाही. आमची नावे वगळण्यात आलेली आहेत. मतदारयादीत मतदारांचा नावांचा घोळ आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. एकाच घरातील पाच व्यक्तींचे वेगवेगळ्या मतदार केंद्रावर नावे आहेत. एकाच घरातील पत्ता परंतु त्यांचे पाच ठिकाणी वेगवेगळे नाव असल्यामुळे मतदानावर परिणाम होतो, अशी मतदारांची तक्रार आहे.

‘राज्य निवडणूक आयोग जाहीर करणारी यादी अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक असावी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादी माझे नाव होते. पण आता विधानसभेच्या मतदार यादीत नाव सापडले नाही.’
- राजेश पवार, मतदार, अजमेरा कॉलनी

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com