पूरग्रस्तांच्या आर्थिक मदतीत तांत्रिक अडथळा
पिंपरी, ता. १९ : पावसाळ्यात नुकसान झालेल्या शहरातील पूरग्रस्तांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. चार महिने लोटले तरीही हे नागरिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याची माहिती पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. या अडचणी दूर करून त्यांच्यावर रक्कम जमा केली जाईल, असेही तहसील कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
जुलै महिन्यातील शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शहराला पावसाचा तडाखा बसला होता. शहरातील मुळा, पवना या नद्यांना पूर आला होता. हजारो घरांमध्ये पुराचे आणि पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदतीची मागणी केली जाऊ लागली. पूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. तहसील विभागाकडून सात हजार ५१९ घरांचे पंचनामे करण्यात आले. सरकारकडून पूरग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले. मात्र, अद्यापही काही पूरग्रस्तांना अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. तलाठी कार्यालयात देखील अनेक नागरिकांनी आंदोलन केले. मात्र, त्याची दखल घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पिंपरी परिसरातील आंबेडकर कॉलनी, रमाईनगर, भाटनगर, बौद्ध नगर त्याचप्रमाणे दापोडी आणि सांगवी या परिसरात देखील अनेक नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. या बाबत वारंवार पाठपुरावा करून देखील तहसील कार्याकडून कोणतीही माहिती मिळत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे. पिंपरी तलाठी कार्यालयासमोर गेल्या महिन्यामध्ये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही. दरम्यान, पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालय यांनी दिलेल्या माहितीनुसार खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे परत येत आहेत. नेमकी कोणती तांत्रिक समस्या आहे, याची तपासणी करण्यात येणार आहेत. संबंधित पूरग्रस्तांच्या खाते अपडेट नसल्याने खात्यावर पैसे जमा होत नाही. त्यामुळे संबंधितांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना बँकेच्या खात्यांची कागदांची पूर्तता करण्यास कळवले आहे.
तांत्रिक बाबींमुळे अद्याप काही नागरिकांना पैसे मिळाले नाहीत. त्या सर्वांची यादी मागवली आहे. अडचणी काय आहेत, हे तपासले जाईल. त्यावर तोडगा काढून संबंधितांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात येतील. अडचणी नसणाऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत.
- मनीषा माने, नायब तहसीलदार, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

